मालेगांव सराफ बाजारात दोघां भोंदु साधुंचा धुमाकुळ! दोघां सराफांना दिवसा लुटले...!

मालेगांव सराफ बाजारात दोघां भोंदु साधुंचा धुमाकुळ! दोघां सराफांना दिवसा लुटले....!

मालेगांव:- मालेगांव शहरातील सराफ बाजारात आज शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोघां भोंदु साधुंनी दोघां सराफांना हात चलाखीने लुटल्याची घटना घडल्याने सराफ बाजारात खळबळ माजली असल्याचे समजते.
याबाबत समजलेली हकीगत अशी की :- आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील सुर्या मार्केट मध्ये दोघे भोंदु साधु आले त्यापैकी एकाने भगवे तर दुस-यांने लाल रंगाचे कापडे घातलेले होते. मार्केट मधील स्वप्नील भरत थोरात या सराफाकडे दोघे गेले आणि त्यास हातातुन शंभर रूपयांची नोट व फुल काढुन दाखविले. त्यानंतर त्याच्या अंगावर पाणी शिंपडुन हातातील सोन्याची अंगठी त्यांनी हात चलखीने लंपास केली.त्यानंतर त्यांच्या समोरील मधुकर पवार या सोने-चांदीचा टंच काढणा-या कारागीराकडे त्यांनी अशा पद्धतीने हात चलाखीकडुन हाताच्या बोटातील अंगठी काढुन पलायन केले.
   एका तासानंतर या दोघा दुकानदारांना लक्षात आले की,दोघां भामट्या सांधुनी आपल्या हाताच्या बोटातील अंगठ्या गायब केल्या.या दोघां साधुंना शोधण्याचा सराफांनी प्रयत्न केला.मात्र ते सापडु शकले नाही.या दोघां साधुंनी सराफ बाजारातील इतर  व्यावसायिकांना अशाच प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नाही,असे समजते.
   किल्ला पोलीसांना या घटनेची खबर मिळताच पोलिसांनी संबंधित सराफाकडे जावुन घटनेची माहिती घेतली तसेच दोघां भामट्या साधुंचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरेत  आलेले ताब्यात घेतले.पुढील कारवाई पोलीस करत असल्याचे समजते.

टिप्पण्या