कुकाणे येथील दामपात्याचा अपघातात मृत्यू

कुकाणे येथील दामपात्याचा अपघातात मृत्यू

कुकाणे (ता. मालेगाव)  कुकाणॆ गावातील प्रतिष्ठित नागरीक
येथील नितीन भानुदास अहिरे (वय ३८) व कविता नितीन अहिरे (वय ३३) हे दाम्पत्य लग्नाला ठेंगोडा येथे मुक्कामी गेले होते. सकाळी ठेंगोड्याहून पाळदे येथे दुचाकीवर (एमएच ४१ डीसी ३०६६) लग्नासाठी जात असतांना त्यांना पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच १२ एलटी ९९४४) चिंचावड फाट्याजवळ जबर धडक दिली. अपघातात नितीन अहिरे यांच्या डोक्याला मार लागून ते जागेवरच ठार झाले. तर कविता यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. तसेच पुढे चालणाऱ्या ॲपेरिक्षाला (एमएच १६ एबी ५७६२) देखील ट्रकने धडक दिल्याने रिक्षा पलटली. रिक्षामधील चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अहिरे दाम्पत्याला तीन आपत्य असून यात दोन मुलगी व एक मुलगा आहे. त्यांच्यावर सायंकाळी सातच्या सुमारास कुकाणे गावातील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. 
  
अहिरे परीवारावर जाॆ दु:खाचा आघात झाला आहॆ त्यात मी,माझॆ कुटूंब व आमचा पुर्ण शॆवाळॆ परीवार तसॆच कुकाणॆ गावातील सर्व मिञ परीवार, सर्व ग्रामस्थ, सर्व सामाजिक, राजकिय संघटना, ग्रामपंचायत, वि.का.सॆवा साॆसायटी, जि.प.प्राथमिक शाळा कुकाणॆ व साविञीबाई फुलॆ मा.विद्यालय कुकाणॆ, लष्कर-ए-शिवबा समाजहित संघटना कुकाणॆ तसॆच एल.आय.सी.परीवार मालॆगाव व आम्ही कुकाणॆकर Whatsapp सामाजिक ग्रुप* सहभागी आहॆत....

टिप्पण्या