मान्सून आपत्ती संभाव्य धोकादायक मालेगाव प्रभाग निहाय ठिकाणे बघा.सुकाणु समिती व मामनपाचे विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत मान्सुन पुर्व आपत्ती व्यवस्थापन आराखडा बैठकीचे आयोजन.

सदर बैठकीत विविध विभागांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात

शहर अभियंता

1) सदर कालावधीत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत.

2) सदर कालावधीत शहरातील सर्व रस्त्यांवरील बांधकामाचे साहित्य पावसाळ्यापुर्वीउचलण्याची कार्यवाही करावी.

3) आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतरीत केलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याकरीता मामनपा शाळा इमारती, समाज मंदिरे, मंगल कार्यालये, लॉन्स
इत्यादीचा आढावा घेतील.

4) बंधारा / नाल्यावरील पुल किंवा बंधारा फुटला असेल तर तिकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पोलीसांच्या मदतीने बंद करतील व रस्ता चालु होण्याबाबतच्या सुचना फलक त्या ठिकाणी लावतील. वाहतुक सुरळीत होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना हाती घेतील.

5) आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेवुन बुल्डोझर, जेसीबी, अर्थमुव्हर, क्रेन, ट्रक्स,टिप्पर्स इ. घटनास्थळी रवाना करतील. मदत कार्यास लागणान्या साहित्याची व्यवस्था करतील.

6) आपत्कालीन परिस्थितीमध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे पथक सुसज्ज ठेवतील.

उप अभियंता (पाणी पुरवठा विभाग) :

1) शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटल्यास त्या तातडीने दुरुस्त करणे.

2) स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरवठा होईल यावर नियंत्रण ठेवतील.

3) पिण्याच्या पाण्याचे टँकर आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देतील.

4) आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाची आपत्कालीन टीम 24x7 सज्ज ठेवतील व घटनास्थळी किमान वेळेत प्रतिसाद देवुन यंत्रणा उपलब्ध करुन देतील. आवश्यक यंत्रसामुग्री तातडीने उपलब्ध करुन देतील.

5) आणीबाणी स्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाययोजना तयार ठेवतील.

(6) तात्पुरत्या निवान्याच्या जागी शाळा इ. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यास तातडीने सदर ठिकाणी पर्यायी व्यवस्था करतील.

7) धरणे व पाटबंधारे विभागाशी संपर्क व समन्वय ठेवून वेळोवेळी धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबतची माहिती आपत्कालीन कक्षास व मा. आयुक्त सो यांना देतील.

8) नदीकाठच्या नागरीकांना पुराच्या धोक्याची सुचना देण्याची व्यवस्था करतील.

9) पाण्याच्या टाक्यांवरील विजरोधक यंत्रणा कार्यावित असलेबाबतची खात्री करतील.

10) शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची नियमीत तपासणी करणे व अशुद्ध पाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता घेणे.

प्रमुख स्वच्छता निरीक्षक :

1) सर्व ड्रेनेज चोकअप काढून ड्रेनेज लाईन मोकळ्या करुन घेण्याची कार्यवाही करणे,

2) सर्व प्रभागातील भुमिगत गटारी, पावसाळी गटारी तुंबुन फुटणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना करुन परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील.

3) आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभागवार ड्रेनेज विभागाची आपत्कालीन टीम 24 x 7 सज्ज ठेवतील व घटनास्थळी किमान वेळेत प्रतिसाद देवुन यंत्रणा उपलब्ध करुन देतील.

(4) आवश्यक यंत्रसामुग्रीची सूची बनवुन आवश्यक साहित्य व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देतील.

5) पावसाळ्यात पाणी साचलेल्या ठिकाणच्या पाण्यास मार्ग करून देवुन प्रवाहीत करणेबाबतची कार्यवाही करतील.

6) पावसाळ्यापुर्वी शहरातील मुख्य नाले, नदी, गटारी यातील गाळ काढून स्वच्छ करणे, गटारीचे पाणी रस्त्यांवर येणार नाही याची दक्षता घेतील.

7) शहरात घाण कचरा दिसणार नाही व साथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेतील.

8) शहरात रोगराई पसरुन नये म्हणून सदर काळात औषध फवारणीची कामे चालु ठेवावीत.

9) शहरातील केर कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने घंटा गाड्या नियमीत सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने दक्षता घेतील.

10 ) पुर ओसरल्यानंतर रस्त्यांवर तसेच नदीकाठी वाहेन आलेला केरकचरा हटविण्याची दक्षता घेतील.


विद्युत अधिक्षक :

1) बाधित भागातील तसेच शॉर्ट सर्किट झालेल्या ठिकाणचा विद्युत पुरवठा एम.एस.ई.बी.च्या मदतीने तात्काळ खंडीत करतील.

2 ) महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी तसेच पाणी पुरवठा विभागाच्या आवश्यक विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यास मदत करतील.

3) महानगरपालिकेचे विद्युत पोल रस्त्यावर पडल्यास ते तात्काळ हटविण्याची कार्यवाही करतील.

4) आपत्कालीन परिस्थितीत मनपाची दुरध्वनी यंत्रणा तसेच मोबाईल यंत्रणा विस्कळीत होणार नाही याबाबत दक्षता घेतील.

5) आपत्कालीन परिस्थितीत निवान्यासाठी स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी तात्पुरती

दुरध्वनी व्यवस्था करतील.

6 ) आपत्कालीन परिस्थितीत पॉवर स्टेशन, सब स्टेशन, फिडर्स, ट्रांसफॉर्मर याबाबतची माहिती विद्युत महामंडळाकडुन घेवुन सुस्थितीत असल्याबातची खात्री करतील. तसा अहवाल संबंधित विभागाला सादर करतील.

7) विद्युत पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था ठेवणे. (उदा. जनरेटर्स पुरेशा इंधनासह)

8) तातडीची विद्युत दुरुस्तीसाठी सुसज्ज पथक तयार ठेवणे.

9) आपत्कालीन परिस्थितीमध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे पथक सुसज्ज ठेवतील.

आरोग्याधिकारी :

1) पावसाळ्यात आवश्यक तो पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवतील.

2) आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी मामनपाच्या सर्व दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वार्ड बॉय इ. टीम सज्ज ठेवतील.

3) आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सज्ज ठेवतील.

4) स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यावर नियंत्रण ठेवतील.

5) निवारास्थळी असलेल्या नागरिकांसाठी दिल्या जाणान्या अन्न, पाणी व औषधे यांची तपासणी करून दक्षता घ्यावी.

6) रुग्णालयांमध्ये माहिती केंद्रांची निर्मिती करणे व हेल्पलाईन क्रमांक अद्यावत करणे.

7) साथीच्या रोगाची लागण झाल्यास वैद्यकीय उपचार करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करणे.

8) आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थांची यादी तयार करुन ठेवणे.

9) रक्तपेढीशी समन्वय साधुन लागणारा रक्तसाठा रुग्णांना उपलब्ध करून देणे.

(10) मान्सुन काळात शहरात रोगराई व साथीचे आजार, सर्पदंश, श्वानदंश इत्यादीच्या उपचाराचे गोळ्या औषधे, इंजेक्शन यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा.


प्रभाग अधिकारी :

1) सर्व प्रभाग बेकारी एकमेकांच्या तसेच मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवतील.

2) प्रभाग कार्यालयांमध्ये पुर नियंत्रण कक्ष स्थापन करून पावसाळ्याचे संपुर्ण कालावधीत 24 तास कार्यरत राहील याची दक्षता घेतील.

3) संभाव्य धोकादायक प्रभाग निहाय ठिकाणे खालीलप्रमाणे
(अ) प्रभाग क्र. 1: गवळीवाडा, शितला माता नगर, मकाजीबेडा, पंचशील नगर, मा. कॅम्प, श्रीराम नगर जवळील वस्ती, खलील शेठ चाळ जवळील भाग, डोर बस्ती सांडवा पुलाजवळील भाग, माणिक नगर, भायगाव, टेहेरे चौफुली इ.

ब) प्रभाग क्र. 2 स.नं.55, नदी किनान्याजवळील भाग इ.

क) प्रभाग क्र. 3 किल्ला झोपडपट्टी, इस्लामाबाद, गालीब नगर, इदगाह झोपडपट्टी, बोहराबाग, सिध्दार्थ नगर इ.

ड) प्रभाग क्र. 4 चावचाव नगर बजरंगवाडी, अमरधाम स्मशानभुमी जवळील भिलाटी, भिकनशा दर्गा जवळील भाग, पवारवाडी आग्रा रोड जवळील भाग इत्यादी प्रभागातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जावुन नागरिकांच्या जिवीत व वित्तीय हानीची शक्यता नाकारता येत नाही. वरील धोकादायक परीसरात खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी नियोजन करून तशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी
तसेच याकामी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात.


4) सर्व प्रभाग अधिकान्यांनी आपले अधिपत्याखालील तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी / कर्मचारी यात चतुर्थ श्रेणी कर्मचान्यांपासून अभियंतापर्यंत आपत्कालीन टिम सज्ज ठेवतील यामध्ये इलेक्ट्रीक वायरमन, बिगारी, हेल्पर, स्वच्छता कर्मचारी इ.चा समन्वय ठेवतील.

5) धोकादायक परिसरात रहिवास करणाऱ्या नागरिकांना नोटीसा देतील.

6) पुर परिस्थितीत नदीकाठी असलेल्या झोपड्यांना पुराचा धोका संभावत असल्यास त्या तात्काळ काढून घेण्याची कार्यवाही करतील.

7) पुर परिस्थितीत नदीकाठच्या नागरीकांना धोक्याची सुचना देतील.

8) धोकादायक परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही करतील व तात्पुरत्या निवाऱ्याची व भोजनाची व्यवस्था करतील.

9) पुर परिस्थितीत स्थलांतरीत करावयाच्या आपतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणेकामी संबंधित विभागातील शाळा इमारती, समाज मंदिरे यांच्या चाव्या ताब्यात घेवुन तेथील व्यवस्थेची जबाबदारी पार पाडतील. त्यासाठी मामनपा शिक्षण मंडळ, खासगी शाळा, कॉलेजेस, मंगल कार्यालये इ.ची यादी जबाबदार व्यक्तींची नावे व फोन नंबरसह तयार ठेवतील.

नगररचनाकार:

1) सर्व प्रभाग अधिकाऱ्यांसह पुर रेपेची आखणी करुन त्यातील अतिक्रमणे काढणेकामी 1 वाहन व पथक सर्व साहित्यानिशी तयार ठेवणे, तसेच शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे करुन त्यांना त्वरीत नोटीस देणे जेणेकरून जिर्ण इमारती पडुन जिवीत व वित्त हानी होणार नाही.

सुरक्षा अधिकारी:

(1) धोकादायक ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दीचे ठिकाणी बंदोबस्त ठेवतील.

2) नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करणेसाठी प्रभाग अधिकारी यांना मदत करतील.

3) आवश्यकता भासल्यास तालुका समादेशक होमगार्ड अथवा पोलीस विभागाची मदत घेतील.

4) आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांच्या आदेशाचे व सुचनांचे पालन करून कार्यवाही करतील.

5) स्थलांतराच्या ठिकाणी अथवा शिबिरात सुरक्षा व्यवस्था प्रदान करणे.

6) आपात्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचारी यांचे पथक सुसज्ज ठेवणे

उद्यान अधिक्षक

1) आपत्ती काळात शहर व परिसरात झाडांची पडझड झाल्यास ती त्वरीत दुर करुन वाहतुकीस अडथळा येणार नाही दक्षता घ्यावी.

2) आपात्कालीन परिस्थिती हाताळणेसाठी प्रभागवार उद्यान विभागाची टीम 24x7 सज्ज ठेवतील व घटनास्थळी किमान वेळेत प्रतिसाद देवन यंत्रणा उपलब्ध करून देतील.

प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण मंडळ :

1) स्थलांतरीत नागरिकांना शाळा इमारतीमध्ये निवारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शाळा इमारतींच्या मुख्याध्यापक / शिक्षक / शिपाई यांना दक्ष राहण्यास
आदेशित करतील.

2) स्थलांतरीत नागरिकांना शाळा इमारतींमध्ये निवारा दिल्यानंतर तेथील आवश्यक त्या व्यवस्थेची जबाबदारी पार पडतील व वेळोवेळी आपत्कालीन कक्षास संपर्क

3) प्रभाग अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन मनपा शाळा व्यतिरिक्त खासगी शाळा.कॉलेजेस इ.शी संपर्कात राहून तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करतील.

जनसंपर्क अधिकारी :

1) आपत्कालीन परिस्थिती महानगरपालिका करीत असलेल्या कार्यवाहीची प्रेसनोट म. आयुक्त सो. यांचे मान्यतेने प्रसिध्दी माध्यमास देतील,

2) महानगरपालिका मा. आयुक्त सो., म. महापौर व प्रमुख पदाधिकारी यांना वेळोवेळी परिस्थितीची माहिती देतील.

3) आपात्कालीन कक्षाकडील माहिती वेळोवेळी मा.आयुक्तांचे मान्यतेने प्रसिध्दीस देतील.

4) प्रेसनोट, इलेक्ट्रॉनिक मिडीया व आकाशवाणी, दूर चित्रवाहिनी यांना जनजागृती व माहितीपर नोंद ठेवून संबंधिना कळविणेबाबत कार्यवाही करतील.

अन्न निरीक्षक :

(1) उपहारगृह व उघड्यावरील खाद्यपदार्थांची तपासणी वेळोवेळी करावी.

आस्थापना पर्यवेक्षक :

1) संभाव्य परिस्थितीत आपत्ती नियंत्रण कक्षात 24 x 7 कर्मचाऱ्यांची नेमणुक करणे व प्रतिवर्षी प्रमाणे पावसाळ्याच्या कालावधीकरीता दर आठवड्यास अधिकारी / कर्मचारी यांच्या नेमणुका करणे,

गॅरिज इंचार्ज :

1) संभाव्य परिस्थितीत सर्व वाहने व यंत्रसामुग्री इंधन व चालकांसह सदैव तत्पर ठेवणे.

2) आपात्कालीन परिस्थितीमध्ये वाहन दुरुस्ती व देखभाल कर्मचारी यांचे पथक सुसज्ज ठेवणे.मुख्य अग्निशमन अधिकारी तथा आपात्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रमुख

1) आपत्तीच्या सुचना मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी तथा आपात्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रमुख यांनी खालील बाबींची तयारी करुन आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीच्या बैठकीचे आयोजन करावे.

2) जखमी व्यक्तींना रुग्णालयांमध्ये स्थलांतरीत करणेस प्राधान्य देणे पडझड झालेल्या घरांमधुन बाधीत व्यक्तींची सुटका करणे.

3) बाधीत क्षेत्रामधुन सर्व व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे.

4) आग विझविणे, शोध व बचाव कार्य इ. कामे किमान वेळेत तातडीने सुरु करणे.

5) रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करणे व वाहतुक यंत्रणा सुरळीत करणे.

6) पुर परिस्थितीत नागरिकांच्या मालमत्तेची तसेच वित्त अथवा जिवीत हानी होणार नाही याची खबरदारी घेतील.

7) पुर परिस्थितीत जिवरक्षक, पोहणारे कर्मचारी यांचेसाठी लाईफरींग, लाईफ जॅकेट व इतर साधने तयार ठेवतील.

8) आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्व प्रमुख यांचेशी संपर्कात राहुन आप निवारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पूर्तता करतील.

9) महानगरपालिका मुख्यालय तसेच अग्निशामक दल मुख्यालय येथील नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत ठेवतील.

10) आपात्कालीन परिस्थितीमध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे पथक सुसज्ज ठेवतील.

11) तसेच अतिरीक्त मदतीची आवश्यकता भासल्यास त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना कळवतील.

            सदर बैठकीस श्री. भालचंद्र गोसावी (आयुक्त, मालेगाव महानगरपालिका) एल.एस.दोंदे (पोलीस उप विभागीय अधिकारी) श्री. दिगंबर भदाणे (किल्ला पोलीस स्टेशन पी.आय.) श्री. संजय महाजन (शहर पोलीस स्टेशन पी.आय.) श्री. राहुल पाटील (उपायुक्त श्री तुषार आहेर (सहा. आयुक्त) श्री. राजु खैरनार (मुख्य लेखापरिक्षक) श्री. के. आर. बच्छाव (शहर अभियंता) श्री. संजय दादाजी पवार (प्रमुख अग्रिशमन अधिकारी श्री. तौसिफ शेख (आस्थापना पर्यवेक्षक). श्री. अभिजीत पवार (विद्युत अधिक्षक) श्री. शोएब अख्तर (सहा. अभियंता पा.पु.वि.) श्री. अ. बा. रौंदळ (सहा. अभियंता श्रेणी-१ जलसंपदा विभाग), एस. एस. मोरे ( पंचायत समिती ) इत्यादी अधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या