हॉलमार्किंग (Gold Hallmarking) अनिवार्य झाल्यानंतर 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेटच्याच दागिन्यांची विक्री केली जात आहे. तर 20, 23, 16 किंवा अन्य कॅरेटच्या ज्वेलरीला हॉलमार्क केल्यानंतर गोल्ड लोनसाठी गहाण ठेवता येईल
नवी दिल्ली, 23 जून: गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking) साठी नवीन नियम सरकारने लागू केले आहेत. याचा थेट परिणाम ज्वेलर्सवर (Jewelers) पडणार आहे. मात्र सामान्य भारतीयांकडे देखील जुने सोन्याचे दागिने असतील आणि त्यांना त्यावर गोल्ड लोन घ्यायचे असेल तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
आयआयएफएल सिक्योरिटीज (IIFL) चे रिसर्च व्हॉइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार, अधिकांश भारतीयांकडे हॉलमार्क नसणारे सोन्याचे दागिने (Non-Hallmarking Jewellery) आहेत. जर तुम्हाला सोनं सोन्याची विक्री करायची असेल तर पहिल्यांदा हॉलमार्किंग एजन्सीकडून हॉलमार्किंगचं काम करून घ्या. यानंतर तुम्ही सोने विक्री किंवा कर्जासाठी वापरावे. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार या नियमांचा सामान्यांवर विशेष परिणाम होणार नाही. पण हे जुन्या आणि हॉलमार्किंग ज्वेलरी नसलेल्या ग्राहकांसाठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे नियमानंतर येत असलेल्या समस्येबाबत ज्वेलर्स आपला अभिप्राय देत आहेत. मंत्रालयही या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.ल
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन आशिष पेठे यांच्या मते, हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर गोल्ड लोनवर परिणाम होईल. गोल्ड लोनसाठी जुन्या दागिन्यांची हॉलमार्किंगची कॉस्ट अधिक असेल. लोकांसाठी हॉलमार्किंगचं शुल्क 35 रुपये प्रति ज्वेलरी आहे. मात्र समस्या अशी आहे की, हॉलमार्किंग केवळ 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेटमध्ये आहे. जर ज्वेलरी 20 कॅरेटची आहे तर तिला 18 कॅरेटमध्ये बदलावं लागेल. अशाप्रकारे रुपांतरित करण्यासाठी दागिने वितळावे लागतील आणि पुन्हा बनवण्यासाठी मेकिंग शुल्क देखील द्यावं लागेल. तथापि पेठे यांचे म्हणणे आहे की तारण सोन्याबाबत मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. सरकारने समितीची स्थापना केली आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे.
सोनं कर्ज देणारी मोठी कंपनी मणप्पुरमचे प्रवक्ता रंजन श्रीधीरण यांनी न्यूज18 ला पाठवलेल्या मेलमध्ये असे म्हटलं आहे की मणप्पुरम आरबीआय अंतर्गत एनबीएफसी स्वरुपात रजिस्टर्ड आहे. या नियमाअंतर्गत कमपनी वापरलेल्या घरगुती सोन्याच्या दागिन्यांना गहाण ठेवत त्या बदल्यात पैसे देते. कंपनीच्या मते गोल्ड हॉलमार्किंगचा नियम किरकोळ दागिने विक्री करणाऱ्यांवर लागू होतो. पण आता हे निश्चितपणे घडेल की तारण ठेवण्यासाठी येणार्या सोन्याची गुणवत्ता चांगली असेल. ही परिस्थिती कर्जदारांना अधिक लाभ देईल. दरम्यान हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेची पडताळणी करून कंपनी कर्ज देणं चालू ठेवत आहे.
टिप्पण्या