सत्ताधाऱ्यांच्या सुडाचा हिशेब मतदार घेणार: अजित पवार मालेगांव भेटीत अजित दादा कडाडले !

सत्ताधाऱ्यांच्या सुडाचा हिशेब मतदार घेणार: अजित पवार
मालेगांव भेटीत अजित दादा कडाडले !

मालेगाव :- राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाकडून सूडाचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा असो वा ऋतुजा लटके यांचा राजीनामा असो प्रत्येक प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. अडवणूक करून कालहरण करणे हीच ईडी (एकनाथ देवेंद्र ) सरकारची रणनीती आता जनसामान्यांच्या लक्षात आली आहे. याचा हिशोब मतदार करतील असा घणाघाती टोला राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांनी लगावला. 

मालेगावी माजी आमदार रशीद शेख यांच्या नागरी सत्कार सोहळ्यापूर्वी विश्रामगृहावर शासकीय पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने या योजनेत गौडबंगाल केले आहे. याची योग्य आकडेवारी देण्यात येईल. एवढ्या कमी पैशात शासनाने वस्तू उपलब्ध करून दिल्या ही बाब संशयास्पद आहे. गोरगरिबांना वस्तू मिळाल्या पाहिजे मात्र यात शासनाचा हेतू चुकीचा असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मालेगावी नूरबाग मैदानावर माजी आमदार रशीद शेख यांच्या झालेल्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेते पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर,माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर ताहिरा शेख, माजी आमदार असिफ शेख, राजेंद्र भोसले, डॉ. सईद अहमद, उमेश पाटील, प्रसाद हिरे, अर्जुन टिळे आदी उपस्थित होते. सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. 

येथील माजी आमदार तथा गेली चाळीस वर्षे सक्रीय राजकारणात सहभाग असलेले रशिद शेख यांच्या नागरि सत्कार सोहळ्यासाठी ना. पवार मालेगावी आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  

  लोकशाही मध्ये विचार मांडायचा अधिकार सर्वाना शिवाजी पार्क या ठिकाणी होतो. मात्र या वर्षी त्याला परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबई महापालिका आपल्या अधिपत्याखाली असल्याचा दुरूपयोग सत्ताधारी करीत आहेत असा आरोप करीत त्यांनी ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणाचे उदाहरण दिले. तृतीय श्रेणी अधिकार असलेल्या लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असता त्यांचा राजीनामा प्रकरणात न्यायालयात जावे लागले, सत्ताधारी वाढती महागाई, बेरोजगारी, शेती व शेतकऱ्यांकडे प्रश्न याकडे दुर्लक्ष करीत आपले बहुमत सांभाळण्यात व्यस्त आहेत. राज्यातील जनता हे सर्व अवलोकन करीत आहे. येणाऱ्या निवडणूकीत चुकांचा व या राजकिय अडवणूकिचा हिशोब होईल. चूक आमची असेल तर त्याचा परिणाम आम्ही भोगू मात्र सध्या राजकारणात काय चालले आहे. या संदर्भात आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.


टिप्पण्या