हिंग्लाज नगर येथील रेशन दुकानदाराचा मनमानी कारभाराची चौकशी करा-

हिंग्लाज नगर येथील दुकान नं ७/१ या रेशन दुकानदाराचा मनमानी कारभाराची चौकशी करा-शिधापात्रिका धारकांची मागणी

मालेगांव :- हिंग्लाज नगर येथील दुकान नं ७/१,दुकानमालक मो.फारुक मो.अय्युब हे रेशन दुकानदार कमी धान्याचे वाटप करीत असतो. त्याच्या मनमानी कारभाराची चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी शिधापात्रिका धारकांनी केली आहे..

हिंग्लाज नगर येथील रेशन दुकानदार हा नेहमी रेशन वाटप करताना त्याची मनमानी करीत असतो. ग्रामस्थांना धान्य मालाचे पूर्णपणे वाटप करीत नाही. ऑनलाइन पावती वेगळी काढून धान्य देताना पावतीच्या मागे कमी धान्य लिहून मालाचे वाटप करतो. तक्रार करायला गेल्यावर रेशन दुकानदार ग्रामस्थांना दादागिरी दाखवत असल्याचे बोलले जात आहे. 

   कांही कार्ड धारकांना तक्रार नागरिकांनी संबंधित शिधा वाटप करणाऱ्या दुकानासमोर घडल्याचे स्वत:आमचे प्रतिनिधीने बाघितले असून त्याबाबात संबंधित अधिका-यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिधापात्रिका धारकांनी केली आहे..


     

टिप्पण्या