भावसार क्षत्रिय समाजाचे हिंगलाज माता मंदिर भावसार गल्ली, मढी येथे डोळ्यांची पारणे फेडणारा अद्भुत अलौकिक भव्य दीपोत्सव......
भावसार क्षत्रिय समाजाचे हिंगलाज माता मंदिर भावसार गल्ली, मढी येथे डोळ्यांची पारणे फेडणारा अद्भुत अलौकिक भव्य दीपोत्सव......
मालेगाव- दि. २६ /१०/२०२२ (बुधवार) रोजी बलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा सणाच्या निमित्ताने भावसार क्षत्रिय समाजाचे हिंगलाज माता मंदिर भावसार गल्ली, मढी येथे भव्य दीपोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या दीपोत्सव सोहळ्यासाठी भावसार समाज बांधव व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत या दीपोत्सव सोहळ्यासाठी सर्व भावसार समाज बंधू भगिनींचे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
भावसार क्षत्रिय समाजाचे व हिंगलाज माता मंदिराचे मुख्य पुरोहित श्री अतुल हरिभाऊ हिंगे व श्री गिरीश अतुल हिंगे यांच्या संकल्पनेतून साजरा झालेल्या या या दीपोत्सवासाठी कार्यालयीन प्रमुख श्री शेखरभाऊ भावसार व मंदिराचे सेवेकरी श्री सुनीलभाऊ भावसार यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
टिप्पण्या