मनमाड रोडवरील राजस्थान हॉटेल जवळ मनमाड कडून मालेगावच्या दिशेने येणारी महामंडळाची बस पलटी होवून ४१ प्रवासी जखमी त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल
मनमाड रोडवरील राजस्थान हॉटेल जवळ मनमाड कडून मालेगावच्या दिशेने येणारी महामंडळाची बस पलटी होवून ४१ प्रवासी जखमी त्यांना उपचारा साठी सामान्य रुग्णालयात दाखल
(मोसम गिरणा न्युज, मालेगांव)
पुणे-शिंदखेडा बस क्र. एमएच २० बीएल ३१२६ ही मनमाड येथून मालेगावच्या दिशेने येत असताना राजस्थान हॉटेल जवळ बसचे ब्रेक लायनर चिटकल्याने बस जागीच पलटी झाली. या बस मध्ये एकूण ४१ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. स्थानिकांच्या मदतीने जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मालेगाव : येथील मनमाड रोडवरील राजस्थान हॉटेल जवळ मनमाड कडून मालेगावच्या दिशेने येणारी महामंडळाची बस पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात बस मधील एकूण ४१ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२७) रोजी सायंकाळी सदर घटना घडली.
टिप्पण्या