“ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ”१ मे पासुन आपल्या मालेगांवात सुरू....
मालेगांव :- म.शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे निर्देशान्वये “ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” पहिल्या टप्प्यात राज्यातील एकुण 342 तालुक्यात 1 मे, 2023 रोजी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे हस्ते डिजिटल अनावरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात “ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे हस्ते डिजिटल अनावरण सोहळयानंतर सुरु करुन सदर दवाखाना ” मध्ये खालील प्रमाणे आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
1) बाह्रय रुग्ण सेवा
2) मोफत औषधोपचार
3) मोफत तपासणी
4) टेलीकन्सल्टेशन
5) गर्भवती मातांची तपासणी
6) लसीकरण
तसेच या केंद्रामध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरीक्त खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
1) महिन्यातुन निश्चित दिवशी नेत्र तपासणी
2) बाह्रय यंत्रणेद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणीची सोय
3) मानसिक आरोग्यासाठी समूपदेशन सेवा
4) आवश्यक्तेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा
*बाह्रयरुग्ण विभागात खालील विशेषज्ञ संदर्भ सेवा विशेषज्ञांमार्फत प्रदान करण्यात येणार आहे.
1) भिषक (फिजीशियन)
2) स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ
3) बालरोग तज्ञ
4) नेत्ररोग तज्ञ
5) त्वचारोगतज्ञ
6) मानसोपचार तज्ञ
7) कान नाक घसा तज्ञ
मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत “ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” *दि.01 मे, 2023* रोजी पासुन ना.आ.केंद्र रमजानपुरा, गट नं.218, प्लॉट नं.20, शाबदा क्लिनीक जवळ, हाजी अहमदपुरा, पाक पंजातण चौक, मालेगाव येथे कार्यान्वीत होणार असुन म.शासनाच्या निर्देशान्वये उक्त नमुद वैद्यकिय सेवेचा लाभ सर्व नागरीकांनी घेणे कामी मा. आयुक्त तथा प्रशासक, भालचंद्र गोसावी यांचे मार्फत सर्व नागरीकांना जाहिर आवाहन करणेत येत आहे.
(स्वाक्षरीत/-) (सुहास प. जगताप) उपायुक्त (मुख्यालय),मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
टिप्पण्या