पोलीस ठाणे गांधीचौक हद्दीमध्ये दिनांक 27 ते 28 ऑगस्टच्या मध्यरात्री चैनसुख रोड, तापडिया मार्केट जवळ असलेले बालाजी टेलिकॉम नावाचे मोबाईल दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने उचकावून ,आत प्रवेश करून विविध कंपनीचे मोबाईल, टॅब, स्मार्ट वॉच जुने मोबाईल, तसेच रोख रक्कम 12,000/- असा एकूण 1 कोटी 34 लाख 37 हजार 755 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस ठाणे गांधीचौक चे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे गांधीचौक चे पोलीस अधिकारी व अमलदारांचे वेगवेगळे पथके तयार करून तपास सुरू होता. धुळे,मालेगाव, नाशिक व गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, वडोदरा या ठिकाणी रवाना करण्यात आले होते.
अकबरखान हबीबखान पठाण, वय 37 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक. खैसरखान हबीबखान पठाण, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक. मंहमद अहमद उर्फ कल्लू असलम अंसारी, वय 22 वर्ष, राहणार बिस्मिल्ला बाग, जेला हॉटेल जवळ, मालेगाव जिल्हा नाशिक. झिब्राईल उर्फ जीब्बो इस्माईल अन्सारी, वय 20 वर्ष राहणार, अन्सार बाग, गुरुवार वार्ड, मालेगाव जिल्हा नाशिक. आमिनखान इस्माईल अन्सारी, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी ,मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. चोरलेला मुद्देमाल विविध कंपनीचे 195 मोबाईल, 10 स्मार्ट वॉच, 06 टॅब असा एकूण 74 लाख रुपयाचा मुद्देमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली इनोव्हा कार व इतर मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण हे करीत आहेत. महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, नाशिक, अकोला ,परभणी ,धुळे, नांदेड, धाराशिव, गडचिरोली ,छत्रपती संभाजी नगर, पुणे व इतर राज्यात चोरी संदर्भाने एकूण 24 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे गांधीचौक चे संयुक्त पथकातील पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले व पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, प्रवीण राठोड, नौशाद पठाण, पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार, आक्रम मोमीन, पोलीस अमलदार खुर्रम काझी, राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, रवी गोंदकर, राहुल सोनकांबळे, राम गवारे राजेश कंचे, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजू मस्के, राहुल कांबळे, संतोष खांडेकर,मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे, नकुल पाटील, दयानंद आरदवाड, रणवीर देशमुख, दत्तात्रय शिंदे, भाऊसाहेब मंतलवाड, दयानंद सारोळे, अभिमन्यू सोनटक्के, नंदकिशोर शेंडगे, महेश पारडे, शिवाजी पाटील, विनोद चलवाड, महादेव मामडगे, विष्णू पंडगे, परमेश्वर स्वामी, सायबर सेल लातूरचे पोलीस निरीक्षक अशोक बेले महिला साहेब पोलीस निरीक्षक गावंडे पोलीस अमलदार संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांनी केली आहे.
टिप्पण्या