व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या रथ महोत्सवाला दोनशे एक वर्षे पूर्ण... मालेगावी नवरात्रोत्सवात निघते मिरवणूक : पाचव्या पिढीकडून परंपरेचे जतन....
श्री.व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या रथ महोत्सवाला दोनशे एक वर्षे पूर्ण...
मालेगांव :- मालेगावी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक भगवान व्यंकटेश बालाजी ब्रह्मकल्पोत्सव रथ महोत्सवाचे आयोजन देवस्थानच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. यंदा रथ यात्रेस २०१ वर्षे पूर्ण झाले असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील विविध मुख्य रस्त्यांवरून पाच कंदील, रथ गल्ली येथून व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या वतीने मुख्य पुजारी मिलिंद गोसावी यांच्या मार्गदर्शनपर रथ यात्रा काढण्यात येते. रथाच्या पहिल्या दिवसापासून वाहनांवर विविध प्रकाराने नाग, मोर, सिंह, पुष्पक विमान, पालखी, हत्ती, गरूड, मारुती, सूर्य भगवान, अश्व, मोठा रथ अशा विविध प्रतीकात्मक मूर्ती वाहनांवर ठेवून त्यावर देव विराजमान करण्यात येतात. शहरातील असंख्य भक्त देवापुढे नतमस्तक होतात, तर काही भाविक रथ पूजन करतात. नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानच्या मंदिरात दिवसभर धार्मिक विधी करण्यात येतात. सकाळ, दुपार, मालेगावी दरवर्षी नवरात्रात सायंकाळी तिन्ही वेळात वेगवेगळ्या भाविकांच्या मार्फत पूजन केले जाते. मंदिरात मुख्य पुजारींच्या हस्ते भजन, कीर्तनसह हिरण्य अर्चना, तुलसी अर्चन, कुमकुम, दीपार्चन, पुष्पार्चन, नित्य अभिषेकासह धार्मिक विधीचे आयोजन करण्यात येते.
■ दिवसभर मंदिरात भक्तांची दर्शनासाठी मांदियाळी असते. यात्रेच्या पाचव्या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. त्यावेळी मंदिर शेकडो तेलाच्या दिव्यांनी लखलखीत होते. दशमी व अकराव्या दिवशी रथ सीमोल्लंघन मार्गावर दर्शनासाठी उभा करण्यात येतो. मालेगावी व्यंकटेश बालाजी देवस्थानचा नावलौकिक आहे.
. या मंदिरात रथ यात्रेची सुमारे १८२२ सालामध्ये नोंदणी झाली आहे. तर सध्याच्या काळात नजीकच्या काळात शशिकांत गोसावी यांच्यासह कुटुंबातील मिलिंद गोसावी व चेतन गोसावी हे सुमारे पाचव्या पिढीतील 'चिव भाग्येकुटुंब सदस्य देवस्थानचे धार्मिक कामकाज सांभाळून आहे.
■ शहरातील काही तरुणांनी रथ यात्रेची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी एक समिती देखील तयार करण्यात आली आहे. त्यात अध्यक्षपदी अमोल पोफळे, उपाध्यक्ष प्रथमेश पवार, सचिव भाग्येश वैद्य आदींची निवड करण्यात आली आहे.
टिप्पण्या