दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन :- ना.दादाजी भुसे,पालकमंत्री नाशिक जिल्हा

दाभाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन :- ना.दादाजी भुसे,पालकमंत्री नाशिक जिल्हा 

 

मालेगांव - ना.दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक जिल्हा यांनी मा.ना.एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व ना.तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांचेकडे पाठपुरावा करुन दाभाडी, ता.मालेगांव येथे 30 ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास ‘विशेष बाब’ म्हणुन मान्यता मिळवली. याबाबत ना.भुसे यांनी सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री यांचे आभार मानले.

       दाभाडी, ता.मालेगांव येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उप जिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे लवकरच उप जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तसेच पदनिर्मिती होऊन नागरीकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातील. दाभाडीसह परिसरातील गावांच्या नागरिकांना आरोग्यसेवा अधिक गतिमान व सुलभतेने पुरविण्याच्या दृष्टीने उप जिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे फायदेशीर ठरणार असल्याचे ना.भुसे यांनी सांगीतले.

        उप जिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे दाभाडी व परिसरातील गावांच्या नागरिकांना, महिला, बालकांना आरोग्य सोई-सुविधांचा लाभ मिळणार असल्याने सरपंच प्रमोद निकम, सर्व ग्रामपंचायत सदस्य व दाभाडी व परिसरातील नागरिकांनी ग्रामस्थांनी ना.भुसे यांचे आभार मानुन आनंद व्यक्त केला.


टिप्पण्या