श्री क्षेत्र वालझिरी येथे आघारकर परिवाराचे आराध्य दैवत श्री. गुरु गोरक्षनाथ मंदिर आणि धर्मनाथ बीज या कार्यक्रमास 75 वर्षे पूर्ण झाले याबद्दल "मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न"

श्री क्षेत्र वालझिरी येथे आघारकर परिवाराचे आराध्य दैवत श्री. गुरु गोरक्षनाथ मंदिर आणि धर्मनाथ बीज या कार्यक्रमास 75 वर्षे पूर्ण झाले याबद्दल "मोफत आरोग्य तपासणी शिबिर  संपन्न"
वालझिरी(ता.चाळीसगांव,जि.जळगांव):-
12 फेब्रुवारी 2024 आज श्री क्षेत्र वालझिरी येथे आघारकर परिवाराचे आराध्य दैवत श्री. गुरु गोरक्षनाथ मंदिर आणि धर्मनाथ बीज या कार्यक्रमास 75 वर्षे पूर्ण झाले याबद्दल संपूर्ण आघारकर परिवारातर्फे मोफत आरोग्य तपासणी आयोजित केली होती. याचा लाभ साधारण 200 पेक्षा जास्त लोकांनी घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर श्री.ओजस्वी आघlरकर संस्थापक "आघारकर फाउंडेशन" आणि सौ ज्योती सुनील आघारकर संस्थापक "निर्वाण दिव्यांग संस्था." यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी सर्व आघlरकर परिवाराचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या