भाजप नेते सुनील आबा गायकवाड व पदाधिकाऱ्यांची १०० वाहनांतून १६ फेब्रुवारी रोजी अयोध्यावारी;राम जन्मभूमीत साजरी करणार शिवजयंती

भाजप नेते सुनील आबा गायकवाड 
 व पदाधिकाऱ्यांची १०० वाहनांतून १६ फेब्रुवारी रोजी अयोध्यावारी;राम जन्मभूमीत साजरी करणार शिवजयंती
मालेगाव : तब्बल वर्षांनंतर अयोध्येत साकारलेल्या प्रभू रामचंद्राचे दर्शन मालेगावकरांना व्हावे, यासाठी भाजपाचे सुनील गायकवाड याच्या मार्गदर्शखाली शुक्रवारी संघ स्वयंसेवक, एकता मंडळ सभासद व रामभक्तांची अयोध्या दर्शन यात्रा नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यात भाविकांना दर्शनाची व्यवस्था होण्यासाठी मालेगावातून तब्बल शंभर वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
सटाणा नाका येथून १६ फेब्रुवारी रोजी अयोध्या दर्शनासाठी शंभर खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून तरुण कार्यकर्ते, महिला भाविक व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्लिपर कोच, लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मालेगावहून उज्जैन येथील बागेश्वर धाम, काशी विश्वनाथहून अयोध्या असा प्रवास राहणार आहे. १९ रोजी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अयोध्यानगरीत धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक रामभक्तांनी सटाणा नाका येथील भाजपा वॉर रूम येथे नोंदणी करावी, असे आवाहन भाजपाचे सुनील गायकवाड यांनी केले. बैठकीला अतुल शिरोडे, जयप्रकाश पठाडे, गुलाब पगारे, सर्जेराव पवार, बंटी तिवारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुनील चौधरी, सोनू आसी, राकेश शिंदे, जिभाऊ पाटील, जयप्रकाश पठाडे, राकेश अहिरे, राजू शेलार, विजय इप्पर, विरु देवरे उपस्थित होते.

टिप्पण्या