सराफ बाजारात मे. अमर ज्वेलर्स मध्ये साक्षात श्री प्रभु रामचंद्र अवतरले....!

सराफ बाजारात मे. अमर ज्वेलर्स मध्ये साक्षात श्री प्रभु रामचंद्र अवतरले....!
मालेगांव :-आज दिनांक 17/0202024 रोजी सराफ बाजार, मालेगाव येथे मे. अमर ज्वेलर्स चे संचालक श्री. अमर हरिश्चंद्र आघरकर यांचे दुकानात एक विलक्षण आणि अद्भुत योग आला. अखंड भारत देशाने ज्या क्षणाची प्रतीक्षा केली, असा भाग्य योग दिनांक 22/01/2024 रोजी सत्यात अवतरला. पवन भूमी अयोध्या येथे आपले दैवत मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आपल्या हक्काच्या जागी स्वगृही विराजमान झाले. अत्यंत तेजस्वी अशी त्यांची मूर्ती तिथे स्थापन झाली. करोडो लोकांनी त्यांचे आनंदाश्रू नी दर्शन घेतले. 
आपल्या मालेगाव शहरातील सोने चांदीचे कारागिरी काम करणारे आपले सनातनी बंधू. श्री. अमृत जी बागुल यांनी 3 आठवड्याच्या मेहनतीने 19 ग्राम वजन असलेल्या सोन्याच्या धातुवर तसेच्या तसे प्रभू श्री राम यांचे दशावतार असलेली मूर्ती तयार केली. नेत्रदीपक असे काम केलेली ही मूर्ती डोळ्याचे पाण फेडणारी आहे. ह्या प्रतिमेची ऑर्डर श्री. प्रकाश पवार यांनी श्री. अमर आघारकर यांनी दिली होती. श्री. अमृत बागुल यांना आणि त्यांच्या ह्या अद्भुत कार्याला सलाम. आज श्री. अमर आघरकर यांच्या दुकानात श्री. अमृत बागुल यांचा सत्कार करण्याचा योग मिळाला. त्या प्रसंगी अमर आघरकार, प्रशांत सोनवणे, रवी सोनवणे, श्रेयस सोनवणे, सौरभ अक्कर, अंकुर शहा हे सर्व सनातनी बंधू उपस्थित होते.

टिप्पण्या