मालेगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून जबरी चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस

मालेगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून जबरी चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस
नाशिक :- जिल्हयातील मालाविरुध्दचे गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक २१/०२/२०२४ रोजी जायखेडा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सराईत गुन्हेगार नामे १) भगवान सिताराम करगळ, वय ३०, रा. सवंदगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक यास जबरी चोरी करतांना रंगेहाथ पकडले आहे. सदर आरोपीने कबुली दिल्यावरून जबरी चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहे.

१) जायखेडा पोलीस ठाणे येथे गुरनं ६२/२०२४ भादवि कलम ३९४, ३९७,३४

२) सटाणा पोलीस ठाणे येथे गुरनं ९९/२०२४ भादवि कलम ३९२, ३४

३) कळवण पोलीस ठाणे येथे गुरनं २९/२०२४ भादवि कलम ३९२,३४

यातील सराईत गुन्हेगार भगवान सिताराम करगळ यावेसह त्याचे दोन साथीदार २) किरण लक्ष्मण गवळी, वय २४, रा. जळगाव फाटा, निफाड, ता. निफाड, ३) देवा मिथुन शिंदे, वय १९, रा. भरडवस्ती, उगाव रोड, निफाड यांना देखील जायखेडा पोलीस ठाणेकडील जबरी चोरीचे गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतांनी गेल्या तीन दिवसांपूर्वी जायखेडा, सटाणा व कळवण परिसरात पल्सर मोटर सायकलवर येवून पत्ता विचारण्याच्या बहान्याने दुचाकीस्वारांना मारहान करून रोख रक्कम मोबाईल फोन जबरीने चोरून नेल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान त्यांचे कब्जातुन ०३ मोबाईल फोन, रोख रक्कम व एक बजाज पल्सर मोटर सायकल असा ९४ हजार ५० रूपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्हयांचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी यातील अटक आरोपी नामे भगवान सिताराम करगळ याचेकडे सखोल विचारपूस केली असता, त्याने मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या तीन ते चार महिन्यांपुर्वी एका वयोवृध्द महिलेच्या गळयातील तीन तोळे सोन्याची पोत ही जबरीने खेचून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच मालेगाव-मनमाड रोड येथील साई जत्रा हॉटेल समोरून एका इसमाचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेल्याचे सांगत आहे, तसेच त्याने वरील जबरी चोरीचे गुन्हे करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटर सायकल ही चाळीसगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपीतांकडून वरील गुन्हयांचे तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर आरोपी भगवान सिताराम करगळ याचे विरुध्द नाशिक ग्रामीण, जालना, बीड अशा वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये दरोडा, जबरी चोरी, मोटर सायकल चोरी, महिला अत्याचार यासारखे गंभीर स्वरूपाचे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत, तसेच त्याचा साथीदार किरण लक्ष्मण गवळी यावेवर देखील ०२ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री. पुष्कराज सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री. तेघबीरसिंग संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, सटाणा पो.स्टे. चे पोनि बाजीराव पोवार, सपोनि उज्वलसिंग राजपुत, जायखेडा पो.स्टे. चे सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ, कळवण पो.स्टे. वे पोनि एस.पी. शिरसाठ, पोउनि कुलकर्णी, तसेच स्थागुशाचे सपोनि हेमंत पाटील, पोहवा संतोष हजारे, पोना विजय वाघ, देविदास गोविंद, शरद मोगल, नरेंद्रकुमार कोळी यांचे पथकाने सदरचे गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली.

टिप्पण्या