मालेगाव शहरातील आयुबी चौकातील मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश... चोरीच्या १३ मोटर सायकल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलीसांची मालेगावात धडक कारवाई....

मालेगाव शहरातील आयुबी चौकातील मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश... चोरीच्या १३ मोटर सायकल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलीसांची मालेगावात धडक कारवाई....
मालेगांव :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह नजीकचे तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री. तेघबीर संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांनी मालेगावातील ना उघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विकी करण्याचे उ‌द्देशाने येणार असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून पोलीस पथकाने आयुबी चौक परिसरात सापळा रचून संशयीत नामे १) ईकलाख अहमद इम्तियाज अहमद, वय २३, रा. ईस्लामाबाद, रविवार वार्ड, मालेगाव यास ताब्यात घेतले. त्याचे कब्जात मिळून आलेल्या हिरो सलेंडर मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्याने उडवाउडवीवी उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून बौकशी केली असता त्याने व त्यावा साथीदार २) जहिर अहमद अब्दुल, रा. संगमेश्वर मालेगाव अशा दोघांनी मिळून सदरची मोटर सायकल सौंदाणे, ता. मालेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेला आरोपी ईकलाख अहमद यास अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार जहिर अब्दुल याचेसह मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव, नाशिक शहर अशा ठिकाणांवरून एकूण १३ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे कब्जातुन ०७ हिरो स्प्लेंडर, ०२ होन्डा शाईन, ०१ ड्रिम युगा, ०१ हिरो एच. एफ. डिलक्स, ०१ यामाहा एस. एस., ०१ हिरो पेंशन अशा एकुण १३ चोरीच्या मोटर सायकल किं. रू. ६,२५,०००/- रूपये वा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीने कबुली दिल्यावरून मालेगाव तालुका, सटाणा, चांदवड, येवला तालुका, मालेगाव छावणी, जळगाव जिल्हापेठ, भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल बोरीचे ०६ गुम्हे उघडकीस आलेले आहेत. सदर गुन्हयांतील आरोपींनी चोरी केलेल्या मोटर सायकल खरेदी करणारे इसम नामे १) निसार अहमद अक्सर हुसेन, रा. देवीचा मळा, मालेगाव, २) मुजिब अहमद जमील अहमद, रा. संगमेश्वर, मालेगाव, ३) फरान अहमद इमान अहमद, रा. मरीमाता मंदिराचे समोर, मालेगाव, ४) शोएब मोहमद अजहर, रा. टेंशन चौक, मालेगाव, ५) मोहमद शोएब मोहमद इद्रिस, रा. नयापुरा, काबुल बौक, मालेगाव, ६) भिकन दादामिया पिंजारी, रा. देवीचा मळा, मालेगाव यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे. यातील आरोपीना मालेगाव छावणी पोलीस ठाणेकडील गुस्नं ३२३/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्हयात हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी ईकलाख अहमद याचा साथीदार जहिर अब्दुल हा फरार असून पोलीस पथक त्याचा कसोशिने शोध घेत आहे, सदर आरोपींकडून मोटर सायकल चोरीचे आपली गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग श्री. तेघबीर संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. राजु सुर्वे, सपोनि हेमंत पाटील, पोहवा वेतन संवस्तरकर, संतोष हजारे, सुनिल पाडवी, पोना देवा गोविंद, पोकों गिरीष बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०६ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.

टिप्पण्या