आयुक्त रविंद्र जाधव यांचे डासांचा प्रादुर्भाव कमी करणेसाठी फवारणी व धुराळणी करणेकामी मलेरिया विभागास आदेश . . . श्री. आनंदसिंग पाटील, प्रमुख स्वच्छता निरीक्षक भ्र. नं. 8369080029 व श्री. मनिष ठाकरे, मलेरीया स्वच्छता निरीक्षक भ्र. नं. 7020130686 वर संपर्क साधावा
आयुक्त रविंद्र जाधव यांचे डासांचा प्रादुर्भाव कमी करणेसाठी फवारणी व धुराळणी करणेकामी मलेरिया विभागास आदेश . . .
श्री. आनंदसिंग पाटील, प्रमुख स्वच्छता निरीक्षक भ्र. नं. 8369080029 व श्री. मनिष ठाकरे, मलेरीया स्वच्छता निरीक्षक भ्र. नं. 7020130686 वर संपर्क साधावा
मालेगाव वृतसेवा:- मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात डासांचा वाढत्श्सउपद्रवाबाबत मा. आयुक्त तथा प्रशाकस रविद्र जावध यांना तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याअनुषंगाने मनपाच्या मलेरिया विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सकाळच्या सत्रात ट्रॅक्टरद्वारे मलेरीया औषधंची फवारणी करणेची मोहीम हाती घेण्यांत आलेली आहे. त्यासाठी महानगरपालिकेने 10 फवारणी टॅक्टर प्रत्येकी चार फेरीद्वारे शहरातील विविध भागात फवारणीचे नियोजन केलेले असुन त्यानुसार फवारणी देखील सुरु केलेली आहे व यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आलेले असुन सध्याकाळी दोन तीनचाकी वाहनावर फॉगर मशीन द्वारे शहरात धुराळणीचे काम करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार काम देखील सुरु करण्यांत आलेले आहे. येणाऱ्या काळात संपुर्ण शहरात फवारणी व धुराळणी नियमित करणेत येणार आहे. तसेच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये मलेरीया ऑईल टाकण्यांत येत आहे. तसेच सदरची प्रक्रिया निरंतर सुरु राहणार आहे. तरी याबाबत काही तक्रार असल्यास श्री. आनंदसिंग पाटील, प्रमुख स्वच्छता निरीक्षक भ्र. नं. 8369080029 व श्री. मनिष ठाकरे, मलेरीया स्वच्छता निरीक्षक भ्र. नं. 7020130686 वर संपर्क साधुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांनी महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना अवाहन केले आहे की, आपल्या घराच्या व कॉलनीच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
*स्वाक्षरित/-****
उपायुक्त (मुख्यालय)
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
टिप्पण्या