मालेगावातील श्री महादेव घाटावरील श्री महादेव मंदिर!!!...मालेगावची नगरदेवता !!!!....

मालेगावातील श्री महादेव घाटावरील श्री महादेव मंदिर!!!...मालेगावची नगरदेवता !!!!....
मालेगांव:- मालेगावातील श्री महादेव घाटावरील श्री महादेव मंदिर!!!...मालेगावची नगरदेवता !!!!.... नाव ऐकताच शिवभक्तीने मन भरून जाते पेशवा सरदार श्रीमंत नारोशंकर  राजेबहाद्दर यांनी सन 1730 साली किल्ल्याची निर्मिती करण्यापूर्वी मोसम नदीकिनारी या शिवालयाचे बांधकाम केले असुन लवकरच या मंदिराला बांधून तीनशे वर्ष पूर्ण होणार आहे.
            सन 1992 च्या विषम परिस्थितीमध्ये मंदिरात सार्वजनिक पद्धतीने देखभाल व पूजा अर्चा करण्यास सुरुवात झाली.मंदिरातील शिवभक्तांनी मंदिरातील सर्व सण उत्सव नित्य पूजाअर्चा इत्यादी नित्य नियमात होण्यासाठी एक मंदिर प्रशासन असावे म्हणून *श्री महादेव सेवा समिती* स्थापन केली श्री महादेव सेवा समितीच्या अथक परिश्रमाने या मंदिराचा जीर्णोद्धार होत असून परिसरातील उत्तर बाजूस सुंदर श्री शिवपार्वती उद्यानाची निर्मिती केली गेली आहे व मंदिराच्या दक्षिण बाजूस मोठे पटांगण आहे तेथे शिवभक्तांमार्फत विविध धार्मिक कार्य व लग्न सोहळे देखील पार पडत असतात. 
           23 डिसेंबर 2022 च्या पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कार्यक्रमानंतर श्री महादेव घाटावरील मंदिरातील गर्दी अगोदर पेक्षा दुप्पट पटीने वाढली असून गर्दीने मंदिर फुलले आहे.
            सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री महादेव घाटावरील श्री महादेव मंदिरात श्री महाशिवरात्री शुक्रवार दि.8 मार्च 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून खालील प्रमाणे उत्सवाचे नियोजन असेल.
            मंदिर सकाळी चार वाजेपासून दर्शनासाठी खुले असेल.
*आरतीची वेळ:-*
सकाळी 6:00 वा
सकाळी 8:00 वा 
सायं. 7:00 वा
रात्री 12:-00 वा

*पालखी सोहळा*
सकाळी 8 ते 12
*(नगर देवता श्री शिव शंभो पालखी मार्ग पुढीलप्रमाणे...*
*श्री महादेव घाट मंदिर-रामसेतु पुल- म.फुले रस्ता -संगमेश्वर तलाठी कार्यालय -सावता चौक-जगताप गल्ली -भवानी चौक-लिंगायत मंगलकार्यालय मार्गे -शिंपी मंगलकार्यालय -रामसेतु पुल-श्री महादेव घाट मंदिर)*

*अभिषेक*
दुपारी 1 ते 4 वा.


*महिला भजन*
जय शंकर महिला भजनी मंडळ
 (महादेव घाट):-दु 2 ते 4

श्री नारायणी महिला भजन मंडळ:-दु 4ते5;30

भावसार महिला भजनी मंडळ 5:30 ते 7

*सामुदायिक शिवस्तुती पठण*
7:30 ते08 वा.

*पुरुष भजन*
राजस्थानी भजनी मंडळ
रात्री 10ते 12
जयशंकर भजनी मंडळ
(महादेव घाट) रात्री 1ते पहाटे 6 पर्यंत.
       पुढच्या दिवशी 9/03/2024 रोजी दुपारी 12 ते 3 वाजता महाप्रसादाचे आयोजन असेल.
        महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर विविध प्रसाद वितरण सुरू असेल .सायंकाळी 7.00 नंतर गर्दी बघून फक्त मुखदर्शन करण्यात येईल याची नोंद घेऊन शिवभक्तांनी सहकार्य करावे.
        वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींनी दुपारी 1 ते 4 या कमी गर्दीच्या वेळात दर्शनास येण्याचे करावे.
         मंदिराचे जिर्णोद्धाराचे कार्य प्रगतीपथावर असून निधीची कमतरता आहे म्हणून समितीने असा निर्णय घेतला आहे की 51,000 /-रुपये पासून पुढे देणगी देणाऱ्या दानशुराचे नाव कायमस्वरूपी फलकावर लिहिण्यात येईल.तरी दानशूर शिवभक्तांनी श्री महादेव सेवा समितीशी संपर्क साधून शिवकार्यात सहभागी होण्याचे करावे.
श्री शिवमंदिराच्या दक्षिणभागातील पटांगणात लोकप्रिय मंत्री मा.श्री दादाजी भुसे यांनी  50 लक्ष निधीतुन प्रशस्त बहुउद्देशीय हाॅलची निर्मिती  केली आहे त्याचेही लोकार्पण श्री महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी ७:३० वा होणार आहे तसेच लोकप्रिय नगरसेविका सौ.दिपाली विवेक वारुळे यांनी मंदिराच्या परीसर विकासासाठी 30 लक्ष निधी मंजूर केला असुन नुकतेच कामाचे भूमिपूजन मा.श्री रविंद्र जाधव,मा.आयुक्त , मालेगाव महानगर पालिका यांनी केले.
      अशा प्रकारे सर्व घटकातील शिवभक्त व श्री महादेव सेवा समिती महाशिवरात्रीच्या महापर्वासाठी सज्ज असून कार्यकर्ते नियोजनात कटीबद्ध आहेत.
_________________________

श्री महादेव सेवा समिती
श्री महादेव मंदिर
श्री महादेव घाट,श्री गणेश कुंड
मालेगाव 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या