हक्काचा उमेदवार असतांना खासदारकीच्या तोडीचे मालेगांव नेतृत्वहिन आहे का?

हक्काचा उमेदवार असतांना खासदारकीच्या तोडीचे मालेगांव नेतृत्वहिन आहे का?

मालेगाव:- नुकत्याच देशाच्या लोकसभेच्या
निवडणूका जाहिर झाल्या आहेत.मालेगांव, बागलाण या तालुक्याचा न अंतर्भाव असलेल्या मतदार संघात भाजपाने त्यांच्या 'पठडीतला' थकलेला उमेदवार जाहिर करुन मालेगांव व बागलाण वासियांमध्ये नेतृत्वगुण नाहीत की काय म्हणून मालेगांव करांचा आवाज आजवर लोकसभेत पोहचला नाही. कारण मतदमार संघ आदिवासींसाठी राखीव केला गेल्यानंतर सतत २५ वर्षानंतर खुला मतदार संघ झाल्यानंतरही कधी सटाणा कधी धुळे यांनाच प्रतिनिधीत्व देण्यात आले. परंतू लोक संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा हिस्सा असलेला मालेगांव तालुका मात्र आजवर राजकारण्यांनी वंचित ठेवला आहे. या प्रकारामुळे मालेगांव तालुकावासियांमध्ये उपेक्षित पणाची भावना निर्माण झाली असून ती वाढीस लागली आहे. सध्या ज्या उमेदवारांच्या चर्चा आहेत, त्यांच्या बद्दली खात्री वाटत नसल्याने आश्वासक चेहरा असेल याची खात्री वाटत नाही, आणि हिच सल मालेगांवकरांच्या मनात सलत आहे. मालेगांवातून पुर्वानूभव लक्षात घेता चर्चेत असणाऱ्या उमेदवारांच्या बद्दल आतापासूनच एक नाराजीचा सुर आहे. अशा • परिस्थीतीत गेल्या दिड-दोन वर्षातील आयाराम गयाराम वृत्तीच्या राजकारणामुळे वृत्ताच्या जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मालेगांवातील सुज्ञ मतदारांचा कानोसा घेतला असता, एक निस्पृह निष्लंक व आश्वासक असे युवा नेतृत्व आणि व्यक्तीमत्व राजकिय सामाजिक क्षेत्रात वावरतांना दिसत आहे. आणि ते म्हणजे- राजेंद्र भोसले. आगामी लोकसभा
निवडणूकीसाठी राजेंद्रभैय्या भोसले
यांना युवक व ज्येष्ठ मार्गदर्शक
मतदारांची प्रथम पसंती असल्याची
एक सार्वत्रिक जन भावना प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः अनुभवली आहे. युवावस्थेतच नगरसेवक पदापासून ते जिल्ह्यातील एक सर्वमान्य राजकीय व्यक्तीमत्व सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजूभैय्यांकडे बघितले जाते. जिल्हा बँक, मजूर फेडरेशन या संस्थांवर राजूभैय्यांनी आपल्या सर्वस्पर्शी नेतृत्वाची छाप पाडली आहे. या कुठलाही विवाद नाही.

गेली २५ वर्षे मालेगांव मर्चन्टस बँकेचे यशस्वी नेतृत्व, बँकेची प्रगती ही राजूभैय्यांच्या कतृर्वाची साक्ष देते. या शिवाय सर्वच राजकीय पक्ष संघटनांमध्ये राजेंद्र भोसले यांचे मोठ्या अदबीने नाव घेतले जाते. या सर्व परिस्थीतीचा विचार करता आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार संघातील जनतेचा हा हक्काचा प्रतिनिधी, कृतिशील तरुण कार्यकर्ता, आपल्या पक्ष संघटनेशी, विचारांशी, तत्वांशी तडजोड न करणारा, पक्षाशी इमान राखणारा, निष्ठावंत कार्यकर्ता जर आमागी निवडणूकीच्या बॅलेटवर असेल तर अवघ्या धुळे- मालेगांव लोकसभा मतदार संघाला निश्चीतच एक योग्य लोक प्रतिनिधी लाभल्याशिवाय राहणार नाही. आणि अशीच चर्चा मालेगांव बागलाण आणि धुळे लोकसभा मतदार संघातून चर्चिली जात आहे.

टिप्पण्या