मालेगावकरांच्या पुरुषार्थाला तृतीयपंथीयांचा पाठिंबा : मच्छर हटाहो, मालेगाव बचाव...हाय...हाय...मालेगांव महानगरपालिकेचं करायचं...काय...खाली डोकं वरती पाय... पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे....

मालेगावकरांच्या पुरुषार्थाला तृतीयपंथीयांचा पाठिंबा : मच्छर हटाहो, मालेगाव बचाव...हाय...हाय...मालेगांव महानगरपालिकेचं करायचं... काय... खाली डोकं वरती पाय... पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे....

मालेगांव:- मालेगावकरांच्या पुरुषार्थाला तृतीयपंथीयांचा पाठिंबा : मच्छर हटाहो, मालेगाव बचाव...तृतीयपंथी त्यांचे हस्ते मच्छरचे दहन.....मनपा प्रशासनाचा कारभाराबाबत निषेध करण्यात आला....
१) मालेगांव शहरात डासांचा हैदोस झालेला आहे. त्यामुळे नागरीक आजारी पडत आहेत. तसेच कधीही डासजन्य आजाराची साथ बळावू शकते. तसे झाल्यास निष्पाप व निरपराध नागरीकांना आर्थिक झळ सहन करावी लागते व काही वेळेस जीवितासही धोका उत्पन्न होतो. असे असतानाही मनपा प्रशासन केवळ ढिम्मपणे बघ्याची भूमिका घेऊन काही एक कार्यवाही करणेस तयार नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. तसेच मनपा प्रशासनाकडून कायमच मुदतबाह्य औषधांची फवारणी केली जाते व त्यामुळे एकही डास मरत नाही व त्यांचे संख्येत अधिकच वाढ होत आहे. ६०० लिटर पाण्यात मॅलेथिअन औषध किमान ३ ते ४ लिटर टाकून फवारणी करणे आवश्यक असतानाही मनपाकडून केवळ १ ते २ लिटर औषध मिश्र करत असलयाने त्याचा कोणताही प्रभाव पडत नाही व डासांचा नायनाट होत नाही.
२) शहरात सफाईचे कामात कोणतीही नियमीतता नाही. त्यामुळे सपूर्ण शहरभरात जागोजागी कचऱ्याचे डिंग साचलेले दिसून येतात. तसेच साफसफाई होत नसलेने गटारीही तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे गटारीतील सांडपाणी उप्त्यावर येते. परीणामी सर्वत्र असह्य दुर्गंधी साचून डास व माशांचा त्रास वाढतो व त्य मुळे डेंगु, मलेरिया, विषमज्वर, स्वाईन फ्लू, कावीळ इ. साथीचे विविध आजार शहरात बळावलेले दिसून येतात. सांगकामी मनपा प्रशासन याकडे कोणतेही लक्ष देताना दिसून येत नाही. शहरातील रस्त्यांची व गटारींची साफसफाई होणे अत्यावश्यक असून ते काम वरचेवर होणे गरजेचे आहे
 ३) शहरातील बऱ्याच भागात लिकेज पाईपलाईनमुळे गटारीचे पाण्याचा पुरवठा होत असतो. नळ आल्यावर सुरुवातील सुमारे १५ मिनिटेपावेतो गटारीचे पाणी येते व त्यानंतर स्वच्छ पाणी येणेस सुरुवात होते. काकुबाईचा बाग संगमेश्वर, सोमवार वार्ड अशा बऱ्याच परीसरात दूषित पाणीपुरवठा होतो. याबाबत वारंवार मनपा प्रशासनास कळवूनही प्रशासन काहीएक सकारात्मक कारवाई करीत नाही; केवळ थातुरमातुर कारवाई करुन कालापव्यय करुन नागरीकांच्या जीवांशी खेळले जाते.
४) दि.१८.१२.२०२३ रोजी मोसम पुल येथील म. गांधी पुतळ्यापासून ते च्छी महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वारापावेतो आम्ही गडबड लोटांगण घालून आंदोलन केले असता आपण आम्हास लेखी आश्वासन दिले होते की, आमच्या मागण्या त्वंरीत मार्गी लावणेत येतील. त्यापैकी मागणी क्र.१ ही शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत होती. त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच सरदार मार्केटपासून ते उर्दू लायब्ररीपावेतोचे रस्त्याचे काँक्रीटीकरण करणेबाबत काहीएक कार्यवाही करणेत आलेली आहे.
५) शहरात पार्किंग झोन निर्माण करणेबाबत कोणतीही कार्यवाही मनपा प्रशासनाकडून करणेत आलेली नाही. तत्कालीन आयुक्त श्री कांबळे साो. यांनी पार्किंगसाठी १८ जागांचे आरक्षण केले होते. त्याबाबत माहिती दिलेवरही आपणाकडून काहीएक कार्यवाही होत नाही ही खेदाची बाब आहे.
६) मनपाचे शिक्षण मंडळाचे कार्यालयात राष्ट्रध्वज फाटलेले अवस्थेत आढळून आला असताही मनपाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. संबंधीत कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन कार्यवाही करणेत येणार होती. परंतु एक महिन्याचा कालावधी उलटलेतरही राष्ट्रध्वजाचे अवमानाबाबत काहीएक कार्यवाही करणेत आलेली नाही.
प्रलंबीत मागण्यांचे पूर्ततेसाठी वारंवार आंदोलन केलेवरही पूर्तता होत नसेल तर सरकारी व्यवस्था लाचार आहे असेच आम्ही समजावे काय ?

तरी वरील मागण्यांचे पूर्ततेकामी मनपा प्रशासन काहीएक कार्यवाही करणेस तयार नसल्याने आज निषेध मोर्चा काढणेत  आला.
     याप्रसंगी रामदास बोरसे, भरत पाटील ,कैलास शर्मा यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या वेळी क्रांती पाटील,निखिल पवार ,जितु देसले, भालचद्र खैरनार, गोपाळ सोनवणे, पवन भुसे  चेतन वारुळे  जेयश गिते ,तपन जैन, राकेश गवळी. शाम भावसार , राजेश बडजाते ,चेतन आसेरी, निकितन प्रमाणे, फारुक कच्ची,शंकर वाघ, गोपीचद अहीरे, चेतन साखला,तेजस जैन, तूषार छाजेड अर्जुन भाटी, कपिल परदेशी, विकी पाटील, आदीजण उपस्थित होते...
यावेळी तृतीयपंथी उपस्थित राहुन आंदोनलाचा पाठिबा दिला, प्राथमिक मच्छर ची होळी दहन करण्यात आली..


टिप्पण्या