आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव नदी स्वच्छतेसाठी स्वतः उतरले नदी पात्रात


आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव नदी स्वच्छतेसाठी स्वतः उतरले नदी पात्रात
मनपा वृत्त सेवा:- मनपा आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव आज सकाळी ६.३० वा. नदी स्वच्छता अभियानात अल्लमा एकबाल पुलाच्या पलीकडील बाजुस नुमानी पूल परिसरात नदी पत्रात स्वतः उतरून पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल अह.जान मोहम्मद यांना स्वच्छते बाबत आवश्यक सूचना केल्यात.
यावेळी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर जलपर्णी काढण्यात आली 
सदर जलपर्णी ही डासाच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत असतांना जलपर्णी सफाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आयुक्तांनी नदी स्वच्छता मोहीम राबविणे बाबत गेल्या दोन महिन्यांपूर्वी आदेश दिले असुन तेंव्हापासून दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही मोहिम राबविण्यात येत आहे.सदर मोहिमेत स्वच्छता विभागाकडील १०० कामगार ०४ स्वच्छता निरीक्षक, जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर यांचा समावेश होता.

टिप्पण्या