ज्या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टपरीधारकांनी अतिक्रमण करुन ओपन बियर बार सुरु केला आहे तो ओपन बियर बार मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे मोहिम राबवून नेतस्तनाबूद करावा. जेणेकरुन गुन्हेगार तेथे एकत्रित होणार नाहीत व शांततेस गालबोट लागणार नाही.....कोंबिंग ऑपरेशन राबविणे.... सार्वजनिक नागरी सुविधा समितीची मागणी

ज्या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टपरीधारकांनी अतिक्रमण करुन ओपन बियर बार सुरु केला आहे तो ओपन बियर बार मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे मोहिम राबवून नेतस्तनाबूद करावा. जेणेकरुन गुन्हेगार तेथे एकत्रित होणार नाहीत व शांततेस गालबोट लागणार नाही.....कोंबिंग ऑपरेशन राबविणे.... सार्वजनिक नागरी सुविधा समितीची मागणी
मालेगांव:-ज्या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टपरीधारकांनी अतिक्रमण करुन ओपन बियर बार सुरु केला आहे तो ओपन बियर बार मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे मोहिम राबवून नेतस्तनाबूद करावा. जेणेकरुन गुन्हेगार तेथे एकत्रित होणार नाहीत व शांततेस गालबोट लागणार नाही.....कोंबिंग ऑपरेशन राबविणे.... सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की;-दि.९.३.२०२४ पासून ते आजपावेतो शहरातील संगमेश्वर परीसरात सांडवा सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न झाला आहे. उदा. दि.१९.३.२०२४ रोजी रात्री १.३० वाजेचे सुमारास काकुबाईचा बाग, संगमेश्वर येथील रहिवासी आनंद पाटील व सनी परदेशी या दोघा युवकांवर जीवघेणा हल्ला करुन त्यांना कटर शस्त्राचा उपयोग करुन गंभीर जखमी करण्यात आले. त्यांना पाच टाके पडले आहेत व मांडीवर खोलपावेतो जखम झालेली आहे. त्यावेळेस त्या भागातील लोकांनी संयम ठेवून उपविभागीय पोलिस अधिकारी मा.श्री सिद्ध साहेबांकडे आपली कैफीयत मांडून कारवाई करणेची मागणी केली. तेव्हा साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ३ व्यक्तींना अटक करणेत आली आहे. आमचे म्हणणेप्रमाणे त्या भागात जेही कोणी असा गैरप्रकार घडवून आणत असतील त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांचा पूर्वेतिहास शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणेत यावी. आज मितीस शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सुरु असून दोन्ही समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. तसेच लोकसभा निवडणूकीची कार्यवाही सुरु आहे. अशा परिस्थितीत शहरातील शांतता, सामंजस्य व धार्मिक सलोखा जर समाजकंटकांना सहन होत नसेल व ते गैरप्रकार करत असतील तर त्यास आमचा सख्त विरोध राहिल.

तरी आमचे प्रशासनास आवर्जून सांगणे आहे की, ज्या भागात वरीलप्रमाणे गैरप्रकार घडत असतील त्या भागात सखोल चौकशी करणेत यावी तर आपल्या निदर्शनास येईल की उघड्यावर दारु पिणे, परीसरातून जाणाऱ्या महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे व त्या परीसरात शहरातून वेगवेगळ्या परीसरातील समाजकंटक व गुन्हेगार जमा होतात. एक दिवस असा येईल की, त्या गुन्हेगारांमुळे त्या भागातील शांतता धोक्यात येऊन संपूर्ण शहरात काहीही अफवा तयार होईल. मालेगांवचा इतिहास आहे की, अफवेमुळे नेहमीच गावातील जातीय दंगली उफळून आलेल्या आहेत. परमेश्वर कृपेने असा प्रसंग ओढवू नये व शांततेला गालबोट लागू नये म्हणून आपण कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीने केली आहे.

सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, भरत पाटील, कैलास शर्मा, फारुक कच्छी, भालचंद्र खैरनार, चेतेश आसेरी, चेतन साकला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

टिप्पण्या