मालेगांव:- आम आदमी पार्टीचे पूर्व राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार यांनी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे, आपच्या सर्व पदांचा त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे, पवार यांनी 2013 मध्ये आप मध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली होती, आम आदमी पार्टीची सत्ता नसल्यामुळे ज्या वेगाने जनतेची कामे व्हायला हवी होती ती होत नव्हती.
ह्यावेळी पवार यांच्यासोबत डॉ. शरद बोडके, राज्य समन्वयक, हेल्थ विंग,आप, महाराष्ट्र, बाळासाहेब बोडके आप, रवींद्र पवार पूर्व उपाध्यक्ष आप मालेगाव, महेंद्र अहिरे आप पदाधिकारी यांनी प्रवेश केला आहे.
प्रवेशानिमित्त पवार यांनी मिडियाशी बोलतांना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपल्या कार्यकाळात 370 कलम हटविले, सीएए सारखा कायदा आणला, तीन तलाक आणि राम मंदिर यासारख्या प्रश्नांवर क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत, अनेक जनहिताच्या योजना त्यांनी लॉन्च केल्या, भारत देशाचे नाव त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले, यापुढेही देशाच्या भल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर मोहित झालो आहे.
सत्तेवर असलेला पक्षात जनतेची कामे करता येतात हा अनुभव असल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, यापुढें भाजपात जनतेचे काम करण्याची संधी मिळेल, जे व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी मी आम आदमी पार्टीत प्रयत्न केलेत त्यांची संधी मला भाजपाचे वरिष्ठ नेते देतील याची मला खात्री आहे, मी 10 टक्के राजकारण आणि 90 टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करेन, प्रवेश प्रसंगी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्रीकांत भारतीय,अजित चव्हाण, उपस्थित होते.
*संपर्क*
*अजित चव्हाण*
सह मुख्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र प्रदेश संयोजक, बुद्धिजीवी प्रकोष्ट,
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र.
मोबाईल: 98209 99528
*चंदन पवार*
9819414137
7972284500
टिप्पण्या