अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात.. बारा बलुतेदार संघटनेच्या लढ्याला यश
चार वर्षांनी मिळाली हक्काची मदत
नितीन हा मालेगाव (Malegaon News) येथील पॉवर सप्लाय कंपनीत हेल्पर म्हणून कार्यरत होता. मात्र त्यास लाईनमनचे काम देण्यात आले होते. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे उच्च दाबाची वीज वाहिनी जोडताना त्याचा अपघात होऊन त्याला दोन्ही हात गमवावे लागले होते. तसेच त्याला अपंगत्वही आले होते. कंपनीने त्याला कुठलीही भरपाई न दिल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले होते. चार वर्षे चकरा मारूनही दखल न घेतली जात नव्हती. मात्र आज अखेर चार वर्षांनी नितीन पवार यांना मदत मिळाली आहे.
बारा बलुतेदार संघटनेच्या लढ्याला यश
दरम्यान, नितीन पवार यांना मदत मिळावी यासाठी मार्च महिन्यात मालेगावमध्ये (Nashik Malegaon News) बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते. पिडीत कर्मचारी नितीन पवारला भरीव मदत द्यावी, जाचक वाढीव विजबिले कमी करून नागरिकांना न्याय द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. यावेळी पॉवर सप्लाय कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. आता नितीन पवार यांना मदत मिळाल्याने बारा बलुतेदार सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
टिप्पण्या