शासन नियुक्त अधिकार्यांकडे विभागांचा कारभार देणे... मनसे सैनिकांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी....
शासन नियुक्त अधिकार्यांकडे विभागांचा कारभार देणे... मनसे सैनिकांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी....
मालेगांव:-मालेगाव महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र मर्यादित असले तरी लोकसंख्येची घनता जास्त आहे. या भागात मुलभूत सेवा सुविधा पोहोचविणे आव्हानात्मक आहे. त्यासाठी विभागप्रमुखांची जबाबदारी मोठी आहे. नेतृत्व योग्य आणि सक्षम असल्यास यंत्रणा चांगल्याप्रकारे परिणाम देऊ शकतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी दुय्यम दर्जाचे, कनिष्ठस्तरीय कर्मचारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांची पदाला न्याय देणारी पात्रता नसल्याने मनपाची यंत्रणा ढासळून गैरकारभार बळावला आहे. हि एकूणच कार्यपद्धती स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिमा जनमाणसात डागळणारी ठरत आहे. तेव्हा सर्व पातळयांवर सुधारणांची आवश्यकता आहे.
मनपातील अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, उपायुक्त, आरोग्य अधिकारी आदी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाची असलेली पदे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी सांभाळत आले आहेत. तरी गेल्या काही काळात शासनाने प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले असले तरी त्यांना योग्य विभाग आणि जबाबदार्यांपासून दूर ठेवण्याचीच मालिका पाहायला मिळते. त्यामागील कारण अकल्पनीय आहे. अलिकडेच मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी श्री. गजानन पाटील यांची नियुक्ती झाली असली तरी त्यांना त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याचे कळते. याचप्रकारे इतर विभागांचा कारभारही शासन नियुक्त अधिकार्यांकडे नाही. या पदांच्या अधिनस्त कर्मचारी विभागप्रमुख म्हणून कारभार करत आहेत. त्यातून भ्रष्टाचार व गैरकारभार वाढला आहे. यातूनच अलिकडे लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे सत्र सुरु आहे. तेव्हा शासन नियुक्त अधिकार्यांकडे योग्य तो कारभार देण्यात यावा. असे होत नसल्यास सुरु असलेल्या गैरप्रकारांना आपले पाठबळ असल्याचा सूर उमटू शकतो. तरी आठ दिवसात कनिष्ठ अधिकार्यांना कार्यमुक्त करावे,अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे...
यावेळी श्री. राकेश सुभाष भामरे, शहराध्यक्ष,मनसे मालेगाव.अविनाश चव्हाण,पुरुषोत्तम जगताप,प्रतिक सरोदे,शुभम खैरनार,चेतेश आसेरी,योगेश अहिरे,धिरज पवार आदीजण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या