शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचालींना सुरुवात... यंदा सलग पाचव्यांदा ते निवडून आले आहेत. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ नेते तसेच निष्ठावंत म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू
शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचालींना सुरुवात... यंदा सलग पाचव्यांदा ते निवडून आले आहेत. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ नेते तसेच निष्ठावंत म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू
नाशिक :-मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी बसणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.दादा भुसे हे शिवसेना पक्षातील जुने नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. यंदा सलग पाचव्यांदा ते निवडून आले आहेत. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ नेते तसेच निष्ठावंत म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
-एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भुसे यांच नाव आघाडीवर
-शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
-शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचाली- सूत्रांची माहिती दिली.
-मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदी बसणार नसल्याने भुसे यांना संधी, सूत्रांची माहिती.
अडीच वर्षे 'कॉमन मॅन' म्हणून काम केले, कधीही मुख्यमंत्री म्हणून वावरलो नाही. म्हणून जनतेचे मला अमाप प्रेम मिळाले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झालो.
आणखी काय हवं? अडीच वर्षात केलेल्या कामाचे मला समाधान आहे. आता मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे सांगत मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्याने भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याने महायुतीचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला असून सत्ता वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे. आताच्या सरकारमध्ये जसे मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री कार्यरत होते, तसे आताही नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षाकडे एक एक उपमुख्यमंत्रिपद जाईल.
टिप्पण्या