चंदनपुरीच्या खंडेराव महाराज मंदिरात नारळ वाढवुन दादाजी भुसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ... दादा भूसेंनी विरोधकांना चांगलेच घेरले; तोफ डागत अनेक गौप्य स्फोट.... मालेगावचा विकास याच गतीने पुढे सुरू ठेवण्यासाठी धनुष्यबाणाला आशीर्वाद देण्याचे मतदारांना आवाहन
यावेळी बोलताना त्यांनी काष्टी येथील कृषी विज्ञान संकुल, महिला व बाल रुग्णालय, क्रीडा संकुल, तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेला १६४ कोटींचा पीक विमा, १८००० कामगारांना साहित्य वाटप यांसह अनेक विकास कामांची माहिती दिली. तसेच तुम्हाला चंदनपुरीपासून ते मालेगावपर्यंतचे रूप पालटताना दिसत असेल. येत्या एका वर्षभरात चंदनपुरीसह प्रत्येक गावाचे एक वेगळे रुप तुम्हाला पहायला मिळणार आहे, असे उपस्थितांना आश्वासित केले.
तसेच यावेळी बोलताना दादाजी भुसे यांनी विरोधकांवर तोफ डागत अनेक गौप्यस्फोट केले. काही म्हणतात मी होतो म्हणून असं झालं, मी होतो म्हणून तसं झालं. मग हे बाकीचे कोण होते. त्यांचं काही योगदान नाही का..? हा मी पणा, गर्व आहे आणि गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. या मालेगावचे नाव आपण सर्वांनी मिळून सर्वांनी परिश्रम घेऊन नाव मोठे केले आहे. यात आपल्या सर्वांचे योगदान आहे.
आपल्या मालेगावमध्ये शिवपुराण कथा आयोजित केली होती. त्या कथेलाही काहींनी विरोध केला. कथा थांबवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले. काय तर म्हणे ही सरकारी जमीन आहे. यावर कार्यक्रम होऊ शकत नाही. मालेगावमधील एका संस्थेकडे १५० एकर जागा आहेत. यापैकी २५ एकर वर शाळा, कॉलेजेस आहेत आणि सव्वाशे एकर जमीन ही कित्येक वर्षांपासून पडून आहे. तुम्ही आशीर्वाद दिले तर ही जागा येणाऱ्या काळात मालेगावच्या कल्याणासाठी जमा करून घेऊ.
ज्या बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज मिळायचे अशी ती शेतकऱ्यांच्या कष्टाची बँक आहे. त्यात अनेक ठेवीदारांनी आपली आयुष्यभराची कमाई ठेवली होती. तिथे यांनी १ कोटीच्या प्रॉपर्टीवर साडे सात कोटी रुपयांचे कर्ज काढले आणि परतफेड केली नाही आणि बँकेने कारवाई केली तर दादा भूसेने केली. आणि काही लोकांना तर लाज वाटायला पाहिजे. ते जेलमधून बाहेर आल्यावर असे स्वागत करता जसे लढाईवर गेले होते.
त्या दोन्ही संस्थांवर ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई हिरे यांचे नाव ट्रस्टीमध्ये आहे. स्मिता हिरे यांचेही नाव आहे. महिला भगिनी आणि ज्येष्ठांचा आदर म्हणून शांत आहे. नाहीतर त्यामुळे सात ते आठ दिवसांचा विषय आहे, असे म्हणत भुसे यांनी विरोधकांना ललकारले.
नाशिक मर्चंट बँक मालेगाव शाखा येथे काही गरीब मुलांच्या नावाने खाते खोलुन काही दिवसांतच त्या खात्यांवरून कोटींच्या पुढचे व्यवहार झाले आहेत. हा पैसा कुठून आला..? कोणाचा आहे..? या गरीब मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण हे सर्व करत आहे..? याची चौकशी मी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत लावणार असल्याचे यावेळी भुसे म्हणाले.
तुम्ही त्या दिवशी माझ्या वडिलांचा अपमान केला. पातळी सोडून टिका केली. मी ऐकून घेतलं. मात्र, त्याऐवजी जर तुम्ही माझ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा अपमान केला असता तर तुम्हाला सांगितलं असतं की, दादागिरी कशाला म्हणतात. कोणी एक तर म्हणे दादा भुसेची नाशिक, मुंबई आणि दुबईमध्येही प्रॉपर्टी आहे. अरे जरा पटेल असं तरी खोटं बोला. जसजशी २० तारीख जवळ येईल तसं अफवा पसरतील. त्यावर विश्वास ठेऊ नका असे, आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थितांना केली.
माझी तुम्हाला विनंती आहे की, खूप कष्टाने आपण मालेगावची प्रतिमा निर्माण केली आहे. मालेगावचा विकास याच गतीने पुढे सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला २० तारखेला मोठ्या संख्येने धनुष्यबाणाला आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी निवडून आणायचे आहे, असे आवाहन यावेळी दादाजी भुसे यांनी मतदारांना केले.
टिप्पण्या