एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे.
एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकीटात दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरात वादाचा बिगुल वाजला. एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेने चक्काजमा आंदोलनाचा पुकारा केला आहे. राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक दिसले. त्यांनी ही भाडेवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे. भाडेवाढ मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.
एसटीची १५ टक्के भाडेवाढ
ग्रामीण भागातील जीवनवाहिणी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली.
टिप्पण्या