दिनांक ३१ जानेवारी शुक्रवार रोजी मालेगाव येथे भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचा दौऱ्याचे सर्व देशभक्त नागरिकांनी स्वागत करावे व देशविरोधी करवाया करण्यारयास जशास तशे उत्तर द्यावे असे आव्हान :- भाजपा जिल्ह्याध्यक्ष निलेश कचवे
दिनांक ३१ जानेवारी शुक्रवार रोजी मालेगाव येथे भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचा दौऱ्याचे सर्व देशभक्त नागरिकांनी स्वागत करावे व देशविरोधी करवाया करण्यारयास जशास तशे उत्तर द्यावे असे आव्हान :- भाजपा जिल्ह्याध्यक्ष निलेश कचवे
मालेगाव : उद्या दिनांक जानेवारी रोजी मालेगाव येथे भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचा दौऱ्याचे सर्व देशभक्त नागरिकांनी स्वागत करावे व देशविरोधी करवाया करण्यारयास जशास तशे उत्तर द्यावे असे आव्हान भाजपा जिल्ह्याध्यक्ष निलेश कचवे यांनी एका प्रसिद्धि पत्रकादवारे केले आहे.
केवळ मतांच्या लाचारीपोटी किंवा धर्माच्या आड लपून काही राजकीय व धार्मिक संघटना रोहिंग्या विरुद्ध केलेल्या किरीट सोमैय्या यांच्या भूमिकेला विरोध करत असून मालेगावचे शांतता व सुव्यवस्था खराब करण्याचे काम करत आहेत.
वोट जिहाद, लँड जिहाद असे गंभीर प्रकार दिवसेंदिवस वाढत असून देखील त्याबाबत जर किरिटजी सोमैय्या आवाज उचलत असतील तर ते देशहिताचे आहे आणि अश्या देशहिताच्या मुद्द्यावर भारतीय जनता पाटील मालेगाव जिल्हातील प्रत्येकि पदाधिकारी सोमैय्या यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहीन जो कोणी देश विरोधी कारवाई करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहून सोमय्या यांना विरोध करणार असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल.
भारतात २०२३ नंतर जवळपास अडीच कोटी रोहिंगे आज वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करून राहत आहेत,महाराष्ट्रातील मालेगाव सह अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंगे वास्तव्यास आहेत, त्यात मालेगाव मध्ये नुसते रोहिंगेच नसून बांगलादेशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत,त्यामुळे मालेगाव मध्ये २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत रोहिंगे व बांगलादेशी घुसखोरांमुळे पंचवीस हजारांच्या वर बोगस मतदानाचा टक्का वाढला व वोट जिहाद हा प्रकार उघडकीस आला,काँग्रेस,शिवसेना उबाठा व एमआयएम या राजकीय पक्षाच्या तथाकथित नेत्यांनी या प्रकाराला खत पाणी घातले आहे व नगरपालिका प्रशासन तसेच तहसीलदार यांच्यावर दबाव व लालच देऊन रोहिंग्यांना अवैध जन्म दाखले मिळवून दिले.आदरणीय किरीटजी सोमय्या साहेब मालेगाव आल्यावर हिंदू व मुस्लिम देशभक्त बांधवांनी एकत्र येऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करावे,ही कुठल्या विशिष्ट धर्मासाठी किंवा कुठल्या विशिष्ट धर्माचा विरोध नसून देशाच्या अस्मितेचा विषय आहे.भाजपा मालेगाव च्या वतीने प्रशासनालाही विनंती आहे की विरोध प्रदर्शन करणाऱ्यांवर कडक कारवाही करावी असे देखील पत्रकात म्हटले आहे.
टिप्पण्या