विद्या विकास इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रसाद पेठकर यांना रोटरीचा राम गावंडे डिस्ट्रिक्ट सेवा पुरस्कार

विद्या विकास इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रसाद पेठकर यांना रोटरीचा राम गावंडे डिस्ट्रिक्ट सेवा पुरस्कार 


मालेगाव:येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हिजनचे सदस्य 
विद्या विकास इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रसाद पेठकर यांना आंतरराष्ट्रीय रोटरीचे डिस्ट्रिक्टचा उत्कृष्ट रोटरी सेवेसाठी देण्यात येणारा माजी प्रांतपाल स्व.राम गावंडे सेवा पुरस्कार देण्यात आला.

(नागपूर: येथे रोटरी कॉन्फरन्समध्ये माजी उपप्रांतपाल प्रसाद पेठकर यांना राम गावंडे अवार्ड देताना आंतरराष्ट्रीय संचालक पी.श्रीनिवासन , गव्हर्नर राजींदरसिंग खुराणा.) 

नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या रोटरी कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय रोटरीचे संचालक, माजी प्रांतपाल पी.श्रीनिवासन व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजींदरसिंग खुराणा यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. श्री पेठकर यांनी यापूर्वी रोटरीचे अध्यक्ष, उपप्रांतपाल या पदावर काम केले आहे. यंदा रोटरीच्या एमएसएमई, सीएसआर फंड या महत्त्वाच्या कमिटीची जबाबदारी सांभाळत आहेत.
श्री पेठकर यांनी शहर परिसरातील व धुळे व नाशिक लोकसभा मतदारसंघातील अनेक गोरगरीब रूग्णांना शासनाच्या आरोग्यविषयक मदतीसाठी तत्पर पाठपुरावा केला आहे. रोटरीच्या माध्यमातून महिला सबलीकरण, युवकांना रोजगार मार्गदर्शन, रोटरी वाढीसाठी विविध उपक्रम व प्रकल्प राबविले आहेत. गेल्या चोवीस वर्षांपासून रोटरीच्या कार्यात सक्रिय असतात. या सन्मान समारंभास ॲड. गिनी खुराणा, नियोजित प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, नॉमिनेटेड गव्हर्नर डॉ राजेश पाटील, किशोर राठी, माजी प्रांतपाल किशोर केडीया, राजे संग्रामसिंह भोसले, राजीव शर्मा,शब्बीर शाकीर, राजेंद्र भामरे,रमेश मेहेर,डॉ आनंद झुनझुनवाला, आशा वेणू गोपाल, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मंगेश जोशी, शशांक विश्वरूपे आदी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल मालेगाव रोटरी तर्फे श्री पेठकर यांचे कौतुक करण्यात आले.

टिप्पण्या