माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहरात बांगलादेशी, रोहिग्यिा घुसखोरी करीत असल्याची केलेल्या तक्रारीच्या आधारे मा. मुख्यमंत्री सो यांनी चौकशी साठी गठीत विशेष तपास पथक (SIT) च्या चौकशी कार्यपद्धतीत काही सुधारणा करण्याचे आदेश होणे:-मायनोरिटी डिफेन्स कमिटी, मालेगाव यांची मागणी

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहरात बांगलादेशी, रोहिग्यिा घुसखोरी करीत असल्याची केलेल्या तक्रारीच्या आधारे मा. मुख्यमंत्री सो यांनी चौकशी साठी गठीत विशेष तपास पथक (SIT) च्या चौकशी कार्यपद्धतीत काही सुधारणा करण्याचे आदेश होणे:-मायनोरिटी डिफेन्स कमिटी, मालेगाव यांची मागणी

मालेगांव :- खासदार किरीट सोमय्या यांची उशीर जन्मनोंदी चा उपयोग करून बोगस जन्म प्रमाण पत्राद्वारे मालेगाव बांगलादेशी, रोहिंग्या नागरिक घुसखोरी करीत असल्याची तक्रारी वरून मा. मुख्यमंत्री महोद्यांनी तपास पथक (SIT) गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. SIT ने शहरात चौकशीची कार्यवाही सुरु  केली असून सदर शासकीय यंत्रणा ची चौकशी कार्यपद्धतीत काही सुधारणा व्हावी असे आम्हास सद्या गरजेचे वाटत आहे.
(मायनोरिटी डिफेन्स कमिटी, मालेगाव यांचे मालेगांव अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अनिकेत भारती यांना निवेदन देताना सर्व पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहे

  संपूर्ण राज्यात मालेगाव शहर हा अल्पसंख्यांक शहर म्हणून ओळखला जातो. या शहराची एकूण लोकसंख्या पैकी 65% नागरिक हे निरक्षर किंवा कमी शिक्षित असल्यामुळे त्यांच्या बाळाची जन्मनोंद वेळे वर करता आलं नाही व जेव्हा त्यांना जन्म प्रमाणपत्र ची आवश्यकता भासते तेव्हा ते उशीर नोंदणी च्या माध्यमाने जन्मनोंद करत आहे. तरी देखील SIT आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून कार्यवाही करू शकता तो SIT चा अधिकार आहे परंतू चौकशीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही मुद्दे उपस्थित करीत आहोत.
(मायनोरिटी डिफेन्स कमिटी, मालेगाव यांचे मालेगांव मालेगांव महानगरपालिकेचे आयुक्त श्री.रविंद्र जाधव 
यांना निवेदन देताना सर्व पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहे.) 

1. आमच्या असे निदर्शनास आले आहे कि SIT चौकशी करीत असतांना त्यांना ज्या नागरिकांवर सवंशय आहे त्या नागरिकांच्या घरी पोलीस बंदोबस्त घेऊन थेट जात आहे या मुळे परिसरात भय चा वातावरण निर्माण होतो. आमची विनंती आहे कि या संदर्भात SIT ने आपली चौकशी ची कार्यपद्धतीत बदल करावे. ज्या नागरिक वर SIT ला संशय आहे त्यांना कार्यालयात बोलून सखोल चौकशी करावी त्यात आमचे कोणतंही काही एक म्हणने नाही.

2. शहरात बांगलादेश/रोहगिया नागरिकांचा शोध घेणे व बेकायदेशीर रित्या उशीर नोंदी द्वारे जन्म प्रमाण पत्र प्राप्त केलेल्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करने कामी मा. शासनाने SIT चा गठन केले असल्यामुळे सर्व प्रकारच्या चौकशी करने कामी SIT पूर्ण पणे सक्षम आहे. आम्ही पाहत आहोत की, SIT ची तपास सुरु असतांना देखील माजी खासदार किरीट सोमय्या शहरात वारंवार दाखल होऊन, कधी महानगर पालिकेत, कधी तहसीलदार कार्यालय, अश्या प्रकारे कार्यालयात जाऊन आपल्या हाथाने शासकीय वपतरी (रजिस्टर) ची पाहणी करीत आहे, या भामत आगचे तिर्य आक्षेप आहे. जेव्हा चौकशी साठी ग. शाराना ने SIT चा गठीत केल्यानंतर देखील त माजी खासदार किरीट सोमय्या यांना शासकीय वपटर (रजिस्टर) थी छाननी करण्याचा वेगळा अधिकार देण्यात आला आहे काय? त्यांच्या तक्रारी वरूनच म. शासन SIT मार्फत चौकशी सुरु असतांना तिराय व्यक्ती (किरीट सोमय्या) चा कागदपत्रामधे हस्ताक्षेप करने योग्य नसून अरो कृत्य करने हे आम्हास संशयस्पध वाटत आहे म्हणून SIT ची चौकशी असतांना माजी खासदार किरीट सोमय्याचे पुढील हस्ताक्षेप त्वरित थायविण्यात यावे.

वरील प्रमाणे आमचे दोन्ही मुद्यांवर म. शासन व SIT चे अध्यक्ष, सचिव व सदस्य्यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पावेतो गांभीर्याने विचार करुन कार्यवाही न केल्यास दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता मालेगाव येथे म. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने लक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल कृपया नोंद घ्यावी.

टिप्पण्या