श्री.महेश नागरी सह.पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री. जगदीशजी काबरा तर व्हा.चेअरमनपदी श्री.वल्लभदासजी आगीवाल सेक्रेटरीपदी श्री. नारायणदास मुंदडा यांची निवड..


श्री.महेश नागरी सह.पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री. जगदीशजी काबरा तर व्हा.चेअरमनपदी श्री.वल्लभदासजी आगीवाल  सेक्रेटरीपदी श्री. नारायणदास मुंदडा यांची निवड

मालेगांव :- मालेगांव येथील प्रसिद्ध श्री. महेश नागरी सह.पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली. 
   
   चेअरमनपदी श्री. जगदीशजी काबरा,व्हा.चेअरमन म्हणून श्री. वल्लभदासजी आगीवाल व सेक्रेटरी म्हणून श्री. नारायणदास मुंदडा यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. 
नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वश्री.दिलीप मुंदडा, डाॅ.मुकुंद झंवर,कैलासजी शर्मा,जयश्री पुरोहित,प्रेमा जाजु,घनश्याम वर्मा, रमेश बोरवाल,हे संचालक म्हणून अविरोध निवडून आले. 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्री.संदीप अहिरे यांनी कामकाज बघितले. 

नवनिर्वाचित संचालक मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. मा.श्री.दादाजी भुसे,युवा सेनेचे श्री. आविष्कारजी भुसे,यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. 

सलग ३० वर्षांची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवल्याबद्दल चेअरमन श्री.जगदीशजी काबरा व सेक्रेटरी श्री.नारायणदास मुंदडा यांनी सभासदांचे व संस्थेचे सर्व अल्पबचत प्रतिनिधींचे आभार मानलेत. 

टिप्पण्या