काकुबाईचा बाग, खलीलशेठ चाळ व संगमेश्वर इतर परीसरातील नळांतून पाणी पुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करणे न केल्यास...वेळेत सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे आंदोलन करणेत येईल महिलांतर्फे मनपावर हंडा मोर्चा यशस्वी....!
काकुबाईचा बाग, खलीलशेठ चाळ व संगमेश्वर इतर परीसरातील नळांतून पाणी पुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करणे न केल्यास...वेळेत सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे आंदोलन करणेत येईल महिलांतर्फे मनपावर हंडा मोर्चा यशस्वी....!
मालेगांव :-गेल्या अनेक दिवसांपासून काकुबाईचा बाग, खलीलशेठ चाळ व संगमेश्वरातील इतर परीसरात नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा न होता वेळ खंडीत करुन सुमारे १२ ते १५ तास उशिराने पाणी दिले जात आहे.
दुपारी ३ वाजता होणारा पाणीपुरवठा हा पहाटे ३ केला जातो व त्याबाबत कोणतीही सूचना दिली जात नाही. नागरीक झोपत असतात व नळास पाणी येऊन निघून जाते. काम करुन थकलेल्या महिला सकाळी उठून पुन्हा पाण्याच्या शोधात हिंडतात व नंतर माहित पडते की रात्री पाणी येऊन गेले आहे. संबंधीत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता वेळकाढूपणा करुन उडवाउडवीची उत्तरे देतात.
आणि नेहमी पाणीपुरवठा उशिरा होणेचे कारण विचारले असता सांगतात की वीज नव्हती व त्यामुळे आम्ही वेळेवर पाणी देऊ शकलो नाही. एक-दोन वेळेस समजू शकतो परंतु जर सातत्याने वेळीअवेळी पाणी दिले जात असेल तर ती बाब योग्य नाही. त्यामुळे नागरीकांची व महिला वर्गाची खुप तारांबळ उडून पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागते.
तसेच जागोजागी पाईप लिकेजची तक्रार केलेवरही ठेकेदाराची माणसे उपलब्ध नाहीत असे सांगणेत येते व ते लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जाते. वेळेवर पाणीपुरवठा होत नसलेने आपणास सर्व महिला सदर निवेदन देत आहोत. वेळेत सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणेत येईल निवेनाच्या शेवटी म्हटले आहे.
टिप्पण्या