मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरटा अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरटा अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


दि. २४/०५/२०२५ रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी गाव शिवारातून फिर्यादी नामे सचिन भगवान सुर्यवंशी रा. मुंगसे, ता. मालेगाव यांचे मालकिची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी क्र. एम.एच.१८.ए.ए.३२६५ ही दाभाडी शिवार मालेगाव येथे लावलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लबाडीचे इराद्याने सदर पिकअप वाहन चोरून नेलेबाबत मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे गुरनं १३३/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर चोरीच्या घटनेबाबत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. सदर चोरीचे वाहन हे मालेगाव शहराच्या दिशेने आल्याचे प्राथमिक दृष्टया निदर्शनास आले होते, त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहनाचा माग काढून, गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती घेवून सदरचे वाहन हे इसम नामे आसिफ ईकबाल सैफ अहमद, वय ३२, रा. रमजानपुरा, मालेगाव, ता. मालेगाव याने चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यास मुंबई आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले, त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने दाभाडी शिवारातून सदर पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर इसमाचे कब्जातून वरील गुन्हयात चोरून नेलेले बोलेरो पिकअप वाहन क. एम.एच.१८.ए.ए.३२६५ कि. १,३५,०००/-रू. चे हस्तगत करण्यात आले असून, त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. यातील आरोपी आसिफ इकबाल हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी वाहन चोरी, चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, भुषण आहिरे, कैलास चोथमल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.

टिप्पण्या